मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळवण्यात येत आहे. चेन्नईने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. कॅप्टन रोहित शर्मा झिरोवर आऊट झाला. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांची रोहितने पुन्हा एकदा निराशा केली आहे. (mi vs csk ipl 2022 mumbai indians bad started mukesh choudhary take 2 wickets in 1st over rohit sharma and ishan kishan out on duck)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईकडून मुकेश चौधरी याने सामन्यातील आणि आपल्या कोटातील पहिली ओव्हर टाकली. या ओव्हरमधील पहिला बॉल त्याने डॉट टाकला. यानंतर त्याने दुसऱ्या बॉलवर रोहित शर्माला मिचेल सॅंटनरच्या हाती कॅच आऊट केलं.


या धक्क्यातून मुंबई सावरत नाही, तोवर या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर चौधरीने इशान किशनचा स्टंपच उखाडला. इशानलाही भोपळा फोडता आला नाही.


मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, राइली मेरेडिथ, ऋतिक शौकीन, डेनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह आणि जयदेव उनादकट.


सीएसकेचे अंतिम 11 शिलेदार : रवींद्र जडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, एमएस धोनी, ड्वेन ब्रावो, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, महीश तीक्षणा आणि मुकेश चौधरी.