मुंबई: आयपीएलमधील दुसरा सामना मुंबई विरुद्ध दिल्ली ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. रिषभ पंतने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबई संघाला पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस दरम्यान ब्रेबॉर्न स्टेडियमवर रिषभ पंतला हसू आवरेना. यावेळी हसण्याचं नेमकं कारण समजलं नाही. मात्र टॉस जिंकल्याचा आनंदच झाला असावा. टॉस उडवताच रिषभला हसू आलं. त्याने टॉस पाहिल्यावर त्याला आणखी आनंद झाला. कदाचित तो मनात बोलला असावा सॉरी रोहित भाई टॉस तर मीच जिंकला. 


रिषभ पंतने टॉस जिंकल्यानंतर रोहितकडे पाहून स्माईल दिली. इतकच नाही तर त्याने जीभही काढून दाखवली आहे. रिषभचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


रिषभ पंतची खोड्या करण्याची सवय अजूनही गेली नाही. यापूर्वी पंतने रोहित शर्माला गेल्या हंगामात बोटाने गुदगुल्या केल्या होत्या. पंत अशा गोष्टी ग्राऊंडवर करत असतो. त्यामुळे तो नेहमी चर्चेचा विषय असतो. 


दोन्ही संघाचे हेड टू हेड 
 दोन्ही संघ 30 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. मुंबई संघाने 16 तर दिल्लीने 14 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.


दिल्ली संघात डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, एनरिख नॉर्खिया, मुस्तफिजुर रहमान आणि लुंगी एनगिडी सारखे दिग्गज खेळाडू संघातून बाहेर आहेत. त्यामुळे चात्यांची थोडीशी निराशा होऊ शकते.  नॉर्खियाला दुखापत झाली आहे. तर एनगिडी आणि मुस्ताफिजुर पहिल्या सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाहीत. वॉर्नर पहिले 2 तर मार्श पहिले 3 सामने खेळणार नाही.


मुंबई संघ प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिळक, अनमोलप्रीत, पोलार्ड, डेव्हिड, सॅम्स, एम अश्विन, बुमराह, मिल्स, थम्पी


दिल्ली संघ प्लेइंग इलेव्हन : पृथ्वी शॉ, सेफर्ट, मनदीप, रिषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), पॉवेल, ललित, अक्षर, शार्दुल, खलील, नागरकोटी, कुलदीप


पंतने टॉस जिंकताच रोहित शर्मासमोर काढली जीभ, संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लीक करा