मुंबई : आयपीएलच्या (IPL) इतिहासात तब्बल 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सला काय झालंय माहिती नाही. मुंबईला या 15 व्या मोसमात सलग 5 सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलंय. तसंच आता लखनऊ विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनंतर फलंदाजही अपयशी ठरले आहेत. या मोसमात सर्वात महागडा ठरलेल्या खेळाडूने पुन्हा निराशा केलीय. (mi vs lsg ipl 2022 Ishan Kishan smashed the boundary line with  bat after out)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊने दिलेल्या 200 धावांच्या आव्हानाचं पाठलाग करायला मुंबई आली. कॅप्टन रोहित शर्माच्या रुपात मुंबईला पहिला धक्का बसला. रोहितने मुंबईची निराशा केली. त्याने अवघ्या 6 धावा केल्या. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविस 31 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे  57 बाद 2 अशी स्थिती झाली. 


200 धावांचं पाठलाग करताना चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असते. मात्र दोन मोठे खेळाडू आऊट झाल्यानंतर ओपनर इशान किशनवर टीमचा डाव सावरण्याची जबाबदारी होती. मात्र या मोसमात महागड्या ठरलेल्या या इशाननेही यावेळेसही पुन्हा मुंबईला टांग दिली आणि आऊट झाला. 


इशान 17 बॉलमध्ये 13 धावा करुन माघारी परतला. इशान आऊट झाल्याने त्याने ब्राउंडी लाईनवर रागात बॅट मारली. यामुळे कदाचित त्याला दंड ठोठावला जाऊ शकतो.


इशानला या मोसमात फारशी छाप सोडता आली नाही. मुंबई फ्रँचायजीने इशानला या मोसमात 15 कोटी 25 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र इशानला याचा मोबदला अजूनही देता आलेला नाही. इशानने या मोसमातील 6 सामन्यात आतापर्यंत एकूण 191 धावा केल्या आहेत. 


मुंबई प्लेइंग इलेव्हन :  रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, किरोन पोलार्ड, फॅबियन एलन, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि टाइमल मिल्स.


लखनऊ प्लेइंग इलेव्हन :  केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, दीपक हुड्डा,मार्कस स्टोइनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, क्रुणाल पांड्या, दुष्मंथा चमीरा, आवेश खान आणि रवि बिश्नोई.