मुंबई : पंजाब विरुद्ध मुंबई अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या सामन्यात बेबी एबी नावानं प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या डेवॉल्ड ब्रेविसने तुफान फलंदाजी केली. एका ओव्हरमध्ये त्याने बॉलरची पिसं काढली. त्याची फलंदाजी पाहून बॉलरलाही घाम फुटला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लीगमधला 23 वा सामना MCA स्टेडियमवर पंजाब विरुद्ध मुंबईमध्ये झाला. टॉस जिंकून मुंबईने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. पंजाबने पहिल्यांदा बॉलिंग करत 199 धावांचं मोठं लक्ष्य मुंबईसमोर ठेवलं. 


मुंबईला या लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ 12 धावा कमी पडल्या आणि मुंबईचा पराभव झाला. मात्र बेबी एबीने या सामन्यात सर्वांची मनं जिंकून घेतली. पंजाबचा बॉलर राहुल चाहरला बेबी एबीने घाम फोडला. 


राहुल चाहरच्या एका ओव्हरमध्ये त्याने 29 धावा काढल्या. पहिल्या बॉलरवर चौकार आणि नंतर एकामागे एक 4 षटकार ठोकले. 9 व्या ओव्हरमध्ये बेबी एबीनं मैदानात धुमाकूळ घातला. राहुल चाहरच्या एका ओव्हरमध्ये सहज त्याने 29 धावा केल्या. 


पंजाबचा सर्वात भरवशाचा बॉलर म्हणून राहुल चाहरकडे पाहिलं जातं. मात्र तोच बेबी एबीला आऊट करू शकला नाही. त्यामुळे राहुल चाहर काहीसा निराशही झाला. बेबी एबीने ठोकलेल्या चौकार षटकारांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.