BCCI मध्ये सेटींग नसल्याने कोच होऊ शकलो नाही - सेहवाग
टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवान याने बीसीसीआयबाबत फारच धक्कादायक वक्तव्य केलंय. ‘बीसीसीआयमध्ये कोणतीही सेटींग नव्हती, नाही तर मी हेड कोच झालो असतो’, असं सेहवाग म्हणाला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यासोबतच तो म्हणाला की, पुन्हा तो कधीही कोच पदासाठी अर्ज करणार नाही.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग याने बीसीसीआयबाबत फारच धक्कादायक वक्तव्य केलंय. ‘बीसीसीआयमध्ये माझी कोणतीही सेटींग नव्हती, म्हणून मी हेड कोच झालो नाही’, असं सेहवाग म्हणाला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यासोबतच तो म्हणाला की, पुन्हा तो कधीही कोच पदासाठी अर्ज करणार नाही.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केलंय. तो म्हणाला की, ‘मी माझ्या मर्जीने नाही तर बीसीसीआयच्या एका सदस्याच्या सांगण्यावरूनच कोच पदासाठी अर्ज केला होता’.
‘मी कोच यासाठी होऊ शकलो नाही, कारण बीसीसीआयमध्ये माझी सेटींग नव्हती. मी टीम इंडियाचा कोच होण्याबाबत विचार केला नव्हता. बीसीसीआयचे सेक्रेटरी अमिताभ चौधरी आणि जीएम एम.वी.श्रीधर यांनी मला तसा सल्ला दिला होता’.
इतकेच नाही तर सेहवागने असा दावा केलाय की, त्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशीही याबाबत बोलणी केली होती. तो म्हणाला की, ‘मी विराटसोबत बोललो होतो. त्यानेही मला तसे करण्यासाठी होकार दिला होता. त्यामुळेच मी अर्ज केला होता. जर माझ्या मताबाबत विचाराल तर मला यात इंटरेस्ट नव्हता’.
सेहवाग म्हणाला की, ‘जेव्हा मी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान इंग्लंडमध्ये होतो, तेव्हा मी रवी शास्त्री यांच्याशी बोललो होतो. या पोस्टसाठी तुम्ही अर्ज का करत नाहीत, असं मी त्याना विचारलं होतं. त्यावर मला पुन्हा तिच चूक करायची नाहीये, जी मी आधीही केली होती, असे उत्तर त्यानी दिले.