मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मिचेल जॉनसननं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रविवारी मिचेल जॉनसननं ही घोषणा केली आहे. ३६ वर्षांच्या मिचेल जॉनसनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द १० वर्षांची होती. जॉनसननं ७३ टेस्ट, १५३ वनडे आणि ३० टी-२० मॅच खेळल्या. जॉनसन आयपीएलमध्ये मुंबई, कोलकाता आणि पंजाबकडूनही खेळला आहे. या तिन्ही टीमकडून खेळताना जॉनसननं ५४ मॅचमध्ये ६१ विकेट घेतल्या आहेत.


बिग बॅश लीगआधीच घेतला संन्यास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉनसननं मागच्या महिन्यातच ऑस्ट्रेलियाची टी-२० लीग बिग बॅशमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. पण आयपीएल आणि इतर टी-२० लीगमध्ये खेळणार असल्याचं जॉनसन म्हणाला होता. आता मात्र जॉनसननं सगळ्या प्रकारच्या स्पर्धांमधून निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं.


आता सगळं संपलं आहे. मी शेवटचा बॉल फेकला आहे. शेवटची विकेटही घेतली आहे. आज मी क्रिकेटच्या सगळ्या प्रकारातून निवृत्तीची घोषणा करत आहे. टी-२० लीगमध्ये खेळण्याची आशा मी बाळगली होती. पण आता शरीर साथ देत नाही. मी आयुष्याच्या पुढच्या पानाची सुरुवात करत आहे, अशी प्रतिक्रिया जॉनसननं दिली आहे.


वनडेमध्ये भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी


जॉनसननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ५९० विकेट घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी इंग्लंडविरुद्ध होती. जॉनसननं इंग्लंडविरुद्ध १९ मॅचमध्ये ८७ विकेट घेतल्या. तर वनडेमध्ये त्यानं भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली. जॉनसननं भारताविरुद्ध २७ वनडेमध्ये ४३ विकेट घेतल्या.


जॉनसनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द


जॉनसननं ७३ टेस्ट मॅचमध्ये ३१३ विकेट घेतल्या आणि २०६५ रनही केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. १५३ वनडेमध्ये २५९ विकेट आणि ९५१ रन यामध्ये ७३ नाबाद सर्वोत्तम. ३० टी-२०मध्ये ३८ विकेट आणि १०९ रन, यामध्ये २८ सर्वोत्तम