नवी दिल्ली : इंग्लडमध्ये पार पडलेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी महिला क्रिकेटर्सनी अनेक विषयांवर मोदींशी चर्चा केली. यावेळी महिला क्रिकेटर्सनी अनेक प्रश्नही मोदींना विचारले. मोदींशी १२ मिनिटे झालेल्या चर्चेत  दबाव कसा हाताळाव तसेच पंतप्रधान मोदींचे स्वत:चे विशेष डिझायनर आहेत का असे प्रश्न मोदींना यावेळी महिला क्रिकेटपटूंनी विचारले.


यावेळी कर्णधार मिताली राजने मोदींना तुम्ही संपूर्ण टाईम कसा काय मॅनेज करता याचे सिक्रेट विचारले. यावेळी मोदींनी योगा करण्यास सुचवले. त्याचबरोबर चेस खेळण्यासही सांगितले. 


भारताची धडाकेबाज क्रिकेटर हरमनप्रीतने मोदींना तुमचा कोणी विशेष डिझायनर आहे का असा प्रश्नही केला. यावर उत्तर देताना मोदी म्हणाले, माझा असा कोणताही विशेष डिझायनर नाहीये. अहमदाबादमधील एक टेलर आहे जे अद्यापही मोदींचे कपडे शिवतात. यावेळी मोदींनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.