नवी दिल्ली : मिताली राज ही महिला क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स करणारी खेळाडू आहे. तिची मेहनत आणि रन्ससाठीची भूक हे त्यासाठी महत्वाचं कारण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण मितालीच्या या लांब प्रवासात तिला ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरच्या बॅटने मोठी साथ दिली आहे. सचिनने एकदा मितालीला त्याची बॅट गिफ्ट दिली होती. मितालीने त्या बॅटने खूप रन्स केले आहेत. मितालीकडे अजूनही ती बॅट असून सचिनकडून आणखी एक बॅट तिला हवी आहे.  


सचिन आणि मिताली बुधवारी दिल्लीत राष्ट्रीय कन्या दिवसाच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी मितालीने हे गुपित पहिल्यांदाच जगासमोर उघड केलं. मिताली म्हणाली की, ‘सचिन यांनी मला एक बॅट गिफ्ट दिली होती. मी त्या बॅटने खूप रन्स काढले. ती बॅट अजूनही माझ्याकडे आहे. आणि सचिनकडून मला आणखी एक बॅट हवी आहे’.


यावर सचिन लगेच म्हणाला की, ‘मला वाटत होतं की, तिने थांबू नये, म्हणून मी तिला बॅट गिफ्ट दिली. मी आताही बॅट घेऊन आलोय ती तुला देईन, २०२१ चा वर्ल्ड कप जास्त दूर नाहीये’.


मिताली म्हणाली की, ‘जेव्हा मी ६००० रन्स पूर्ण केले तेव्हा सचिन सरांनी माझे अभिनंदन केले होते. त्यासोबतच त्यांनी तेव्हा मला दिलेला सल्ला आजही माझ्या लक्षात आहे आणि नेहमी राहणार. सचिन म्हणाले होते की, हार मानू नको. जर तुला वाटतं की, तू आणखी काही दिवस खेळू शकते तर खेळ’.