नवी दिल्ली :  भारतीय क्रिकेटर इरफान पठाणने आपल्या पत्नीसोबतचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडीयावर टाकला होता. त्यावेळी आपल्या धर्मात असे चालत नाही असे म्हणत काहींनी त्याला ट्रोल केले होते. आता ही वेळ मोहम्मद कैफ याच्यावर आली आहे.महम्मद कैफला इस्लामविरोधी म्हटले जात आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुद्धीबळाच्या खेळावरुनही कैफ झाला ट्रोल काही दिवसांपूर्वी महम्मद कैफने आपल्या मुलासोबत बुद्धीबळ खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता. या फोटोला काहींनी धर्माशी जोडत वेगवेगळ्या कमेंट केल्या होत्या. त्या फोटोला इस्लामविरोधी म्हटले गेले. इस्लाममध्ये बुद्धीबळ खेळायला निर्बंध आहेत, मीपण एक चांगला खेळाडू आहे पण जेव्हा हदीथ वाचले तेव्हापासून मी कधीच बुद्धीबळ खेळलो नाही असे एका युजरने लिहिले होते.

कैफने ७ ऑगस्ट रोजी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन रक्षाबंधनसंबधी एक ट्वीट केले होते.

या ट्वीटनंतर त्याला ट्रोल करण्यात येत आहे. काही युजर्सने त्याच्या या ट्वीटचे खुप कौतुक केले आहे.

तर काही युजर्सने त्याच्याविरोधात फतवा काढण्याची भिती दाखविली आहे.

‘आपल्या बहिणीसोबत जसे वर्तन करता तसेच प्रत्येक महिलेसोबतच करा, सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा’ हे ट्वीट महम्मद कैफने केले आहे. खूप जणांनी यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

सूर्यनमस्कारामुळे ट्रोल

याआधी काही महिन्यांपूर्वी कैफने सूर्यनमस्कार करतानाचा फोटो ट्वीट केला होता. यावरही अनेकांनी संताप व्यक्त केला होता.