Mohammad Rizwan on Suryakumar Yadav : गेल्या काही आठवड्यांपासून ICC T20I क्रमवारीत पहिल्या नंबरसाठी चढाओढ लागल्याचं दिसत आहे. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि भारताचा सूर्यकुमार यादव अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या स्थानावर आहे. दोघेही आपल्या संघासाठी मोलाचं योगदान देताना दिसत आहेत. क्रीडा वर्तुळात दोघांची तुलना केली जात आहे, अशातच मोहम्मद रिझवानने सूर्यकुमारबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (Mohammad Rizwan talk on Suryakumar Yadav latest marathi Sport News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार यादव चांगला खेळाडू आहे. मी त्याच्या खेळण्याच्या शैलीचा आनंद घेतो पण टॉर ऑर्डर आणि मिडल ऑर्डर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आमच्या दोघांबद्दल बोलायचं झालं तर वेगळ्या अँगलने पाहायला हवं. मी फक्त माझ्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करत असल्याचं मोहम्मद रिझवान म्हणाला. 


मी नेहमी संघासाठी खेळतो, रँकिंगला महत्त्व देत नाही. संघाची गरज पूर्ण करण्यासाठी मी माझं सर्व योगदान देतो. मी या सर्व गोष्टींचा फारसा विचार करत नाही. 'मॅन ऑफ द मॅच' आणि नंबर वन रँकिंगसारख्या गोष्टींचा कधी कधी नकारात्मक परिणाम होतो.  फलंदाजी करताना या सर्व गोष्टी माझ्या मनात नसल्याचंही रिझवानने सांगितलं. 


दरम्यान, आयसीसी टी-20 क्रमवारीत मोहम्मद रिझवान पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचबरोबर भारताच्या सूर्यकुमार यादवला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शेवटच्या सामन्यात केवळ 8 धावा करता आल्या होत्या. आता दोन्ही फलंदाजांमध्ये 16 गुणांचा फरक आहे. रिझवानला आता टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी सध्या सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत आपलं स्थान मजबूत करण्याची संधी आहे.