नवी दिल्ली : टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमी हा पत्नी हसीन जहाँ हिच्या गंभीर आरोपामुळे अडचणीत आलाय. मात्र, त्याने पत्नीच्या आरोपाचे खंडन केलेय. त्याचवळी मी पाकिस्तानी मुलगी अलिश्बाला दुबईत भेटल्याचे मान्य केलेय.


माझी इन्स्टाग्राम फॉलोअर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद शमीने आणखी एक मोठा खुलासा केलाय. आपण अलिश्बा नावाच्या एका पाकिस्तानी तरुणीला दुबईत भेटलो होतो, अशी कबुली शमीने दिली आहे. मोहम्मद शमीने रिपब्लिक टीव्हीला मुलाखत देताना सांगितलेय. मी दुबईत अलिश्बाला भेटलो होतो. ती माझी इन्स्टाग्राम फॉलोअर आहे आणि त्याच नात्याने तिच्याशी बोलणं झालं होते, असे शमीने स्पष्ट केलेय.


यात काही गैर नाही !


अलिश्बा दुबईत आपल्या बहिणीच्या घरी आली होती. आपण तिला फक्त एक मैत्रीण, एक चाहती म्हणून भेटलो होतो.  यात काही गैर नाही किंवा चुकीचे नाही तसेच आक्षेपार्ह नाही. पण जे काही रंगविले जात आहे ते चुकीचे आहे, असे शमीने म्हटलेय.


त्याबद्दल विचारही करु शकत नाही


मॅच फिक्सिंगबाबत त्याने इन्कार केलाय. आरोप अत्यंत बेजबाबदार आहेत आणि आपण त्याबद्दल विचारही करु शकत नाही, असे शमीने म्हटलेय. यावेळी शमीला मोहम्मद भाईसंबंधीही विचारण्यात आले. त्यावर बोलताना शमीने सांगितले, मोहम्मद भाईचे नाव कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. त्याला सर्वजण ओळखतात. त्याला संघातील सर्व खेळाडू भेटतात, असे स्पष्टीकरण शमीने दिले.


कोणत्याही चौकशीसाठी तयार 


आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपाबाबत मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. पोलीस असो किंवा बीसीसीआय. मी चौकशीसाठी सहकार्य करण्यास तयार आहे. तसेच चौकशी सुरु आहे. त्यामुळे याबाबत भाष्य करणे योग्य नाही. मी कोणालाही अडचणीत आणू शकत नाही, असे शमी यांने यावेळी स्पष्ट केले. 


चौकशी सुरु आहे


बीसीसीआयने मॅच फिक्सिंग प्रकरणी आपली चौकशी केली असल्याचंही शमीने मान्य केलं आहे. जर माझ्या मनात चोरी नाही तर मग मी चौकशीला का घाबरावे. जर मॅच फिक्सिंग प्रकरणात मी दोषी आढळलो, तर मिळेल त्या शिक्षा भोगायला तयार आहे, असे  शमीने म्हटलेय.