`माझ्या लेकीला भेटू देत नाही...`, मोहम्मद शमीचा पत्नी हसीन जहाँवर खळबळजनक आरोप!
Mohammad Shami Daughter : मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) हिने हिंसाचाराचा आरोप केल्यानंतर न्यायालयीन लढाईच्या कचाट्यात सापडलेल्या शमीने आता मोठं वक्तव्य केलंय.
Mohammad Shami On Hasin Jahan : सध्या टीम इंडियाचे खेळाडू कौटुंबिक कारणामुळे (Family Dispute) अडचणीत सापडले आहेत. शिखर धवनचा घटस्फोट झाल्यानंतर त्याला आपल्या मुलापासून लांब रहावं लागलं होतं. तर नुकतंच रवींद्र जडेजाचा वडिलांसोबतचा वाद उफाळून आलाय. अशातच आता मोहम्मद शमीच्या (Mohammad Shami) आयुष्यात देखील कौटुंबिक वादळ घोंगावत आहे. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) हिने हिंसाचाराचा आरोप केल्यानंतर न्यायालयीन लढाईच्या कचाट्यात सापडलेल्या शमीने आता मोठं वक्तव्य केलंय.
Mohammad Shami काय म्हणाला?
आपल्या कुटुंबाला भेटायला कोणाला आवडत नाही. मला एक व्यक्ती सांगा, जो आपल्या मुलांना आणि फॅमिलीला मिस करत नाही. तुमची परिस्थिती काय आहे आणि तुमच्यासमोर अटी वेगळ्या असतील तर गोष्टी वेगळ्या ठरतात. आपलं रक्त असल्यावर आठवण का नाही येणार? असं शमी म्हणतो. कधी कधी माझ्या मुलीसोबत (Mohammad Shami Daughter) बोलणं होतं. माझ्याकडून जेवढं होतंय, मी तेवढा प्रयत्न करतो. मात्र, तिला भेटता येत नाही. तिने (शमीच्या पत्नीने) मला कधी भेटायची संधी दिली नाही, असा खुलासा शमीने केला आहे.
मी याच गोष्टीचा प्रयत्न करतो की, माझ्या मुलीचं आयुष्य चांगलं रहावं. तिच्या आरोग्य चांगलं रहावं. तिच्या शिक्षणात कोणतीही गडबड होऊ नये. आमच्या दोघांमध्ये जे काही चाललंय, त्याचा परिणाम तिच्यावर होऊ नये यावर माझा भर आहे, असं मोहम्मद शमीने म्हटलं आहे. (Mohammad Shami On Daughter Aaira)
हसिन जहाँचा आरोप
मोहम्मद शमी मला कधी कोणत्याही टूरला घेऊन जात नव्हता. मला नेहमी दबावात ठेवायचं काम तो करायचा. मी त्याच्याशी भांडून 3 किंवा 4 टूरला त्याच्यासोबत गेले. मात्र, तिथंही त्याने मला नीट वागवलं नाही. माझ्यासोबत भांडणं केली, मला खोलीत बांधून ठेवलं होतं, असा आरोप हसिन जहाँ हिने केला होता.
दरम्यान, मोहम्मद शमीच्या पत्नीने मार्च 2018 मध्ये घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. हसीन जहाँने आपल्या तक्रारीत शमीवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तसेच मानसिक त्रास देत असल्याची तक्रार देखील करण्यात आली होती. दोघांविरुद्ध अटक वॉरंटही जारी केलं होतं. मात्र, कोलकाता न्यायालयाने या वॉरंटला स्थगिती दिली होती. त्याआधी, मोहम्मद शमीने हसीन जहाँला मासिक देखभाल भत्ता 1.30 लाख देण्याचे आदेश दिले होते.