मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणीत भर पडलीये. त्याची पत्नी हसीन जहाने त्याच्याविरोधात कोलकातामध्ये एफआयआर दाखल केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हसीनने शमीविरोधात कोलकाताच्या लाल बाजार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केलाय. तिने शमीविरोधात मारहाण तसेच दगा दिल्याचा आरोप केला होता. मात्र हे आरोप शमीने फेटाळून लावले होते.


कोलकाता पोलिसांनी हसीनच्या तक्रारीनुसार मोहम्मद शमीविरोधात भारतीय दंड विधानानुसार 498A/323/307/376/ 505/ 328/ या कलमांतर्गत गुन्हे दाखल केलेत. शमीव्यतिरिक्त पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील आणखी चार सदस्यांविरोधातही एफआयआर दाखल केलाय.




हसीन जहाँने शमीवर गंभीर आरोप लावले आहे. ती म्हणाली की शमीने दुबईमध्ये पाकिस्तानची अलिस्बा नावाच्या तरूणीकडून पैसे घेतले होते. यात मोहम्मद भाई नावाचा एक माणूसही सामील होता. ते इंग्लंडमध्ये राहतात. ती म्हणाली या संदर्भात माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. हसीन जहाँने शमी विरोधात भूमिका घेत म्हटले की शमी हा पत्नी म्हणून मला धोका देऊ शकतो, तर तो देशालाही धोका देऊ शकतो.