मुंबई : भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यामधला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. हसीन जहांनं मोहम्मद शमीवर मारपीट, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. यानंतर हसीन जहांनं शमीविरुद्ध केसही दाखल केली होती. मोहम्मद शमीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही हसीन जहांनं केला होता. मोहम्मद शमीनं हसीन जहांच्या या सगळ्या आरोपांचा इन्कार केला. पहिले हसीनसोबतचा वाद मिटवण्याचा प्रयत्न शमीनं केला पण वाद शमत नसल्यामुळे त्यानं कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला. हसीन जहांनं शमीच्या मुलींसोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट आणि फोन रेकॉर्डिंगही शेअर केलं होतं.


हसीन जहांचे नवीन आरोप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या प्रकरणानंतर आता हसीन जहांनं शमीवर नवीन आरोप केले आहेत. मोहम्मद शमी ईदनंतर लग्न करणार असल्याचा दावा हसीननं केला आहे. तलाक घेण्यासाठी शमीनं मला पैसेही देऊ केल्याचं हसीन जहां म्हणाली आहे. ईदच्या ५ दिवसानंतर शमी त्याच्या मोठ्या भावाच्या मेव्हणीसोबत लग्न करु इच्छितो, अशी प्रतिक्रिया हसीननं दिली आहे.


मोहम्मद शमीची प्रतिक्रिया 


मोहम्मद शमीनं हसीन जहांच्या या आरोपांचा इन्कार केला आहे. मी माझ्या पहिल्याच लग्नामुळे अडचणीत आहे. असं असताना मी दुसरं लग्न कसं करु, असा सवाल शमीनं विचारला आहे. हसीननं माझ्यावर अनेक आरोप लावले आहेत. जर मी दुसरं लग्न केलं तर हसीनला नक्की लग्नाला बोलवेन, असा टोलाही शमीनं लगावला.