राजकोट : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिला टी-२० सामना वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा कारकिर्दीतील अखेरचा सामना होता. तर राजकोटमधील दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पदार्पण केले. आशिष नेहराच्या जागी सिराजला स्थान देण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद सिराजसाठीही हा सामना एखादे स्वप्न सत्यात उतरल्यासारखेच आहे. हैदराबादच्या या क्रिकेटरने पदार्पणाच्या सामन्यात पहिला बळी मिळवला. 


सामन्याआधी सिराजला संघात समाविष्ट करुन घेताना प्रशिक्षक रवी शास्त्रींनी त्याला कॅप दिली. यावेळी इतर खेळाडूंनी त्याला अलिंगनही दिले. 


यानंतर राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानावर पोहोचले. न्यूझीलंडचे राष्ट्रगीत झाल्यानंतर भारताचे राष्ट्रगीत सुरु झाले. राष्ट्रगीत संपल्यानंतर पहिला सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराज मात्र भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. 


भारतीय संघात निवड होण्याआधी मोहम्मद सिराजने भारत अ कडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सराव सामन्यातही त्याने ४ विकेट मिळवल्या होत्या.