T20 World Cup 2024 IND vs USA: टी-20 विश्वचषक 2024 मध्ये अ गटातील सामना खेळवला जातोय. युएसए आणि टीम इंडिया (United States vs India) आमने सामने आहेत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Nassau County) भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने युएसएचा खेळ 110 धावांवर आटोपला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात आलेल्या विराट कोहली याला आणि रोहित शर्माला चांगली फलंदाजी करता आली नाही. सलामीवीर विराट कोहली शुन्यावर बाद (Virat kohli Golden Duck) झाला. गेल्या तिन्ही सामन्यात विराट कोहलीला सलामीला येऊन चांगली कामगिरी करता आली नाही. मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरने (Saurabh Netravalkar) विराटची विकेट घेतली. स्वप्नपूर्ती व्हावी अशी विकेट नेत्रावळकरने घेतली अन् आनंद साजरा केला. मात्र, टीम इंडियाच्या चाहत्यांना टेन्शन आलंय. कारण मोहम्मद कैफचे शब्द खरे ठरले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद कैफ काय म्हणाला होता?


विराट कोहली पाकिस्तानसाठीच नाही तर सर्व संघांसाठी घातक ठरू शकतो. कोणत्याही संघाला त्याला बाद करण्यासाठी धडपड करावी लागते. पण मला असं वाटतं की, त्याने त्याचं अॅग्रेशन थोडं कमी करावं. विराट कोहलीने सलामीला येऊ नये. बॉल फिरत असलेल्या खेळपट्टीवर विराट कोहलीने नंबर 3 वर खेळणं योग्य ठरेल, विराट तीन नंबर खेळला तर अखेरपर्यंत झुंज देऊ शकतो, असं मोहम्मद कैफने म्हटलं होतं. त्यामुळे आता मोहम्मद कैफचा सल्ला विराट आत्तातरी ऐकणार का? असा सवाल विचारला जातोय.


युएसएने दिलेल्या 111 धावांचं आव्हान पार करताना भारतीय वंशाच्या सौरभ नेत्रावलकरने अमेरिकेसाठी पहिले षटक टाकलं. षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतल्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीला स्ट्राइक दिली. ओव्हरचा दुसरा बॉल कोहलीच्या बॅटची कट लागला आणि बॉल थेट अँड्रिज गॉसच्या हातात गेला. त्यामुळे विराट कोहलीला आयसीसी स्पर्धेत गोल्डन डकवर बाद करणारा पहिला गोलंदाज म्हणून सौरभ नेत्रावलकरने नावावर रेकॉर्ड प्रस्थापित केलाय.


युनायटेड स्टेट्स (प्लेइंग इलेव्हन): स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), एरॉन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान.


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.