मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०१८) च्या ११ व्या सीजनमद्ये मोहम्मद शमी दिल्ली डेयरडेविल्सकडून खेळेल किंवा नाही याचा अद्याप निर्णय झालेला नाही. शमी खेळण्याबाबतचा फैसला भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाच्या रिपोर्टनंतर होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर अडचणीत आलाय. त्यामुळे टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या जलदगती गोलंदाज आयपीएल सहभागावर प्रश्नचिन्ह कायम आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाचे प्रमुख नीरज कुमार सध्या मोहम्मद शमीची फिक्सींगच्या आरोपांप्रकरणी चौकशी करत आहेत. 


त्यामुळे त्यांच्या रिपोर्टनंतर त्याच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. यामुळे त्यांच्या अहवालाकडे लक्ष लागलेय. नीरज कुमार यांच्या अहवालानंतरच शमीच्या आयपीएल सहभागावर निर्णय घेतला जाईल असं, बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी स्पष्ट केलेय.


आयपीएलसाठी दिल्ली डेअरडेविल्स या संघाने शमीला ३ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलेय. पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर बीसीसीआयने शमीचा वार्षिक करार राखून ठेवला होता. मोहम्मद शमीचे इतर मुलींसोबत अनैतिक संबंध असून शमी व त्याच्या परिवाराकडून आपला छळ होत असल्याची तक्रार हसीन जहाँने कोलकाता पोलिसांकडे केली आहे.