Mohammed Shami : जखमी असतानाही शमी वर्ल्ड कप खेळला? मुंबईतील डॉक्टरांचा धक्कादायक रिपोर्ट समोर!
Mohammed Shami has ankle condition : टीमची घोषणा करताना बीसीसीआयने (BCCI) शमीवर वैद्यकीय उपचार सुरू असून तो खेळणार की नाही? हे फिटनेसवर अवलंबून आहे, असं म्हटलं होतं. अशातच शमीला झालंय काय? असा सवाल विचारला जातोय.
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची ताकद जगाला दाखवली होती. शमीला यंदाच्या वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) पहिल्या 4 सामन्यात संधी मिळाली नव्हती. मात्र, आता वर्ल्ड सामन्यावेळी शमी जखमी होता का? असा सवाल विचारला जात आहे.
मोहम्मद शमीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेसाठी संघात स्थान मिळालं नाही. त्याला कसोटी टीममध्ये (IND vs SA Test) संधी देण्यात आलीये. मात्र, त्याचं स्थान अद्याप निश्चित नाही. टीमची घोषणा करताना बीसीसीआयने (BCCI) शमीवर वैद्यकीय उपचार सुरू असून तो खेळणार की नाही? हे फिटनेसवर अवलंबून आहे, असं म्हटलं होतं. अशातच शमीला झालंय काय? असा सवाल विचारला जातोय.
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, मोहम्मद शमीला घोट्याचा त्रास होत आहे. वर्ल्ड कपपासून शमीला यासाठी उपचारांची गरज होती. मोहम्मद शमी घोट्याच्या समस्येवर उपचारासाठी मुंबईतील 'स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक'चा सल्ला घेत होता, अशी माहिती देखील आता समोर आली आहे. सेंच्युरियन येथे 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी तो वेळेत तंदुरुस्त होईल, अशी आशा भारतीय संघ व्यवस्थापनाला आहे.
मोहम्मद शमी जेव्हा बंगालचा विजय हजारे ट्रॉफी सामना पाहण्यासाठी आला होता तेव्हा तो काहीसा लंगडत असल्याचं समोर आलं होतं. त्याचबरोबर मुंबई विमानतळावर जेव्हा शमी लंगडत असल्याचं काहींचं म्हणणं होतं. त्यामुळे शमीच्या वर्ल्ड कप सामन्यावर प्रश्नचिन्ह उभा राहिले होते. मात्र, शमीने वर्ल़्ड कपमध्ये फलंदाजांचा बाजार उठवला होता.
कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (WK), केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी*, जसप्रीत बुमराह (VC), प्रसिद्ध कृष्णा.