मुंबई : टी 20 वर्ल्ड कपला (T 20 World Cup 2022) 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियामध्ये (Team India) मोठा बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी वेगवान आणि अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami)  संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने (Bcci) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कपला मुकावं लागलं. त्यामुळे बुमराहच्या जागी कुणाला संधी मिळणार, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सूकता लागून होती. अखेर बीसीसीायने बुमराहच्या जागी शमीला संधी दिलीय. (mohammed shami replaces jasprit bumrah in indias icc mens t20 world cup squad)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी 20 वर्ल्ड कपच्या मुख्य संघात बुमराहचा समावेश होता. तर मोहम्मद शमीचा राखीव गटात समावेश करण्यात आला होता. मात्र आता बुमराहच्या जागी संधी मिळाल्याने शमीचा मुख्य संघात एन्ट्री झाली आहे.


बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला संधी



T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया


रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल , विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.