भारताला मोठा झटका! मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर, चहरही OUT; या खेळाडूला संधी
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. दीपक चहर एकदिवसीय, तर मोहम्मद शमी कसोटी संघातून बाहेर पडला आहे. टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ आता एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे.
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघाने टी-20 मालिका खेळली असून, आता एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. दरम्यान त्याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. जलदगती गोलंदाज दीपक चहर एकदिवसीय संघातून बाहेर पडला आहे, तर दुसरीकडे मोहम्मद शमीला कसोटी संघात स्थान मिळालेलं नाही.
बीसीसीआयने एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. दीपक चहरने कुटुंबातील वैद्यकीय कारणामुळे आपण एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसू असं कळवलं असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. दीपक चहरच्या जागी आता आकाश दीपला संधी देण्यात आली आहे.
दुसरीकडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 24 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद शमीकडून कसोटी मालिकेत फार अपेक्षा होत्या. पण बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला खेळण्याी परवानगी दिलेली नाही. यामुळे वर्ल्डकपचा स्टार गोलंदाज कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
17 डिसेंबरला जोहान्सबर्ग येथे पहिला एकदिवसीय सामना संपल्यानंतर श्रेयस अय्यर कसोटी मालिकेसाठी संघात सहभागी होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी तो उपलब्ध नसणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघ -
रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, अविनाश कुमार, अर्शदीप सिंग, आकाश दीप
कसं आहे वेळापत्रक -
17 डिसेंबर, पहिला एकदिवसीय सामना, जोहान्सबर्ग
19 डिसेंबर, दुसरा एकदिवसीय सामना, पोर्ट एलिजाबेथ
21 डिसेंबर, तिसरा एकदिवसीय सामना, पार्ल
26 ते 30 डिसेंबर, पहिला कसोटी सामना, सेंच्युरियन
3 ते 7 जानेवारी, दूसरा कसोटी सामना, जोहान्सबर्ग