INDvsAUS : टेस्ट सीरीज जिंकल्याच्या आनंदात `या` खेळाडूने खरेदी केली BMW
टेस्ट सीरीजमधून केलं क्रिकेटमध्ये डेब्यू
मुंबई : ऑस्ट्रेलिया टूर यशस्वी जिंकल्यानंतर आज भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रत्येक खेळाडूचं वेगळेपण 'या' सीरीजने अधोरेखित केलं आहे. या यशाचा आनंद आज एका खेळाडूने वेगळ्या पद्धतीने शेअर केला आहे. या आनंदात भारतीय संघाचे चाहते देखील आनंदी झाले आहेत.
खेळाडू मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)चं गृहनगर मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. एवढ्या दिवसानंतर आपल्या कुटुंबियांना भेटून मोहम्मद अतिशय आनंदात होता. पण काही दिवसांपूर्वीच देवआज्ञा झालेल्या आपल्या वडिलांच्या आठवणीने मोहम्मद अतिशय भावूक झाला.
मोहम्मद हैद्राबादमध्ये पोहोचल्यावर पहिल्यांदा आपल्या वडिलांच्या कब्रजवळ पोहोचला. आणि त्याने तिने फातेहामधून आपल्या भावना व्यक्त केल्या. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) जिंकल्याच्या आनंदात फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ने बीएमडब्लू कार (BMW Car) खरेदी केलं आहे.
सिराजने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट स्टोरीवर नवीन लक्झरी कारचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच त्याने कॅप्शन लिहिली आहे की,'अलहमदुलिल्लाह' ज्याचा अर्थ आहे 'सगळं कौतुक देवासाठी आहे.'
ऑस्ट्रेलिया टूर (Australia Tour)मध्ये खेळाडू मोहम्मद सिराजने वनडे क्रिकेटमध्ये डेब्यू केलं आहे. ब्रिसबेन टेस्टच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये सिराजने ५ विकेट घेऊन एकच धम्माल उडवली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) च्या अनुपस्थितीत भारतीय बॉलिंग अटॅकची जबाबदारी सिराजने अतिशय सुंदर सांभाळली. सीरीजमध्ये सिराजने एकूण १३ विकेट घेतल्या.