BAN vs IND: बांगलादेश विरूद्ध टीम इंडिया (BAN vs IND) यांच्यामध्ये 2 टेस्ट सामन्यांची सिरीज सुरु आहे. पहिली टेस्ट 14 डिसेंबरपासून खेळवली जात असून, या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी भारताचा 404 रन्सवर ऑलआऊट झाला असून, बांगलादेशाच्या टीमची फलंदाजीची सुरुवात काही फारशी चांगली झाली नाही. यावेळी टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि बांगलादेशाचा कर्णधार लिटन दास (Litton Das) यांच्यामध्ये मात्र शाब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसून आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि बांगलादेशाचा अनुभवी गोलंदाज लिटन दास (Litton Das) यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि यामध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) देखील सहभाग घेतला. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 


Mohammed Siraj आणि लिटन दास मध्ये नेमकं काय घडलं? 


ही घटना बांगलादेशाचा डाव सुरु असताना 14 व्या ओव्हरमधील आहे. वेगवाग गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याच्या गोलंदाजीने बांगलादेशी फलंदाजांची दाणादाण उडवली. यावेळी ओव्हररचा पहिला बल लिटन दास खेळत होता. त्याने हा बल उत्तम पद्धतीने डिफेंस केला. यावेळी सिराज काहीसा भडकला. सिराजने रागाच्या भरात लिटन दासकडे पाहिलं आणि अपशब्द वापरले. सिराजचा पार चढलेला पाहून लिटन दास देखील मागे हटला नाही. त्याने, कानाच्या मागे हात धरत, ऐकू येत नसल्याची एक्शन केली. 



क्लिन बोल्ड करत सिराजने घेतला बदला


पुढच्याच बॅालवर लिटन क्लिन बोल्ड झाला. सिराजनेच त्याची विकेट काढली.  यावेळी विराटही मागे राहिला नाही आणि त्यानेही लिटनच्या एक्शनवर रिएक्शन दिली.


विराट आणि सिराजने मिळून उडवली लिटनची खिल्ली


लिटनची विकेट गेल्यावर विराटनेही लिटनप्रमाणे स्वतःच्या कानांवर हात ठेवले. त्याला पाहून सिराजनेही आपल्या कानांवर हात ठेवत लिटनची खिल्ली उडवली. त्यामुळे एकंदरीत सिराजला स्लेज करणं लिटनला महागात पडलं.