IPL 2023 : 8 वर्षांनी टीम इंडियामध्ये कमबॅक करणार हा खेळाडू? IPL मध्ये केली दमदार कामगिरी
IPL 2023 : आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये युवा खेळाडूंसोबत काही जुन्या खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली. दरम्यान यामध्ये एका गोलंदाजाची उत्तम गोलंदाजी पाहता, आता तो टीम इंडियामध्ये पुन्हा कमबॅक करणार का, असा प्रश्नही सर्वांच्या मनात आहे.
Mohit Sharma : चेन्नई सुपर किंग्जने ( Chennai Super Kings ) यंदाच्या आयपीएलचं ( IPL 2023 ) जेतेपद पटकावलं असून यंदाच्या सिझनमध्ये युवा खेळाडूंसोबत काही जुन्या खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली. यावेळी गुजरात टायटन्सच्या ( Gujarat Titans ) मोहित शर्माचं ( Mohit Sharma ) नाव चांगलंच चर्चेत आहे. मोहितच्या या उत्तम खेळीनंतर आता तो टीम इंडियामध्ये ( Team India ) कमबॅक करणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसतेय.
यंदाच्या आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) मोहित शर्माने ( Mohit Sharma ) गुजरात टायटन्सकडून ( Gujarat Titans ) 14 सामने खेळताना 25 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या या उत्तम परफॉर्मन्सनंतर त्याचं नाव सध्या फारच चर्चेत आहे. 2015 साली वनडे वर्ल्डकपनंतर मोहित शर्मा ( Mohit Sharma ) एकदम गायब झाला होता. अखेर 8 वर्षानंतर त्याने गुजरातच्या टीममधून कमबॅक केलंय. त्याची उत्तम गोलंदाजी पाहता, आता तो टीम इंडियामध्ये पुन्हा कमबॅक करणार का, असा प्रश्नही सर्वांच्या मनात आहे.
वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर मिळणार मोहितला संधी?
गेल्या वर्षी देखील मोहित ( Mohit Sharma ) गुजरात टायटन्सच्या ताफ्यात होता. 2022 मध्ये मोहित शर्मा ( Mohit Sharma ) गुजरात टायटन्ससाठी नेट्समध्ये गोलंदाजी करत होता. मात्र यंदाच्या सिझनमध्ये मोहितने स्वतःच नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. येत्या जुलैमध्ये वेस्टइंडिज आणि अमेरिकेत पाच सामन्यांची टी-20 सिरीज खेळायची आहे. या सिरीजमध्ये मोहित शर्माच्या ( Mohit Sharma ) नावाचा विचार केला जाऊ शकतो.
गुजरातपूर्वी चेन्नईकडून खेळायचा मोहित
आयपीएलमध्ये मोहित शर्मा ( Mohit Sharma ) चेन्नईकडून देखील खेळला होता. एका वर्षापूर्वीच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना मोहित शर्मा ( Mohit Sharma ) म्हणाला की, मी माझ्या कारकिर्दीचा बराच मोठा काळ हा आयपीएल आणि माही भाईच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमसोबत खेळलाय. 2013-2016 दरम्यान चेन्नई सुपर किंग्जकडून ( Chennai Super Kings ) खेळणं हा माझ्या कारकिर्दीतील एक सुवर्णकाळ होता. मात्र वातावरणाबद्दल म्हणायचं झालं तर गुजरातच्या टीमचं सर्वोत्तम आहे.
मोहित शर्माने ( Mohit Sharma ) टीम इंडियासाठी आतापर्यंत 26 वनडे आणि आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 37 विकेट्स घेतलेत. ऑक्टोबर 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याचा शेवटचा सामना खेळला होता. आयपीएलमध्ये मोहितने 100 सामन्यांमध्ये 23.79 च्या सरासरीने 119 विकेट घेतल्या आहेत.