Ind Vs Pak: ‘ओ भाई मारो मुझे..’फेम Momin Saqib रूग्णालयात दाखल?
आशिया कपच्या सुपरहीट सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्स राखून पराभव केला.
दुबई : आशिया कपच्या सुपरहीट सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्स राखून पराभव केला. दुबईत रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात शेवटच्या ओव्हरपर्यंत लढत पाहायला मिळाली, मात्र भारताने सामना जिंकला. सामन्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतायत. यापैकी एक खास प्रतिक्रिया आहे ती म्हणजे ‘ओ भाई मारो मुझे..’ फेम मोमीन साकिबची.
इंस्टाग्रामवर मोमीन साकिबने सामन्याच्या दिवशी अनेक व्हिडिओ शेअर केलेत. यावेळी जेव्हा बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची विकेट पडली तेव्हा मोमीन एम्बुलंस शोधताना दिसला. व्हिडिओमध्ये तो रडत म्हणतोय की, "आता काय करावं बाबरही आऊट झाला आणि रिजवानही गेला. माझ्यासाठी एम्बुलंस घेऊन या."
याशिवाय एका व्हिडिओमध्ये मोमीन साकिब रडताना दिसतोय. ज्यामध्ये तो टिश्यूने अश्रू पुसतोय. सामना संपल्यानंतर तो स्टेडियममध्ये बसून सतत आपले अश्रू पुसतोय. त्याचे हे सगळे व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे.
सामना संपल्यानंतर मोमीन शकीबने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि भारताचा सामना विजेता हार्दिक पंड्या यांची भेट घेतली. विराट कोहलीशी संवाद साधताना मोमीन शकीब म्हणाला की, "आशा आहे की अंतिम फेरीत दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येतील."
मोमीन साकिब हा सोशल मीडियावरचा मोठा सुपरस्टार आहे. एकदिवसीय वर्ल्डकप 2019 मध्ये, जेव्हा भारताने पाकिस्तानला पराभूत केलं तेव्हा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की, 'ओ भाई, मारो मुझे...' तेव्हापासून मोमीन साकिब सोशल मीडियावर लोकप्रिय ठरतोय.