Bowling coach of Team India : श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यात लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरची हेड कोचपदी नियुक्ती करण्यात आली होती. अशातच आता टीम इंडियाच्या बॉलिंग कोचपदी साऊथ अफ्रिकेचा माजी स्टार गोलंदाज मॉर्ने मॉर्कलची नियुक्ती करण्यात आलीये. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजीमध्ये सुधारणा होईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. मॉर्ने मॉर्कल मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साऊथ अफ्रिकेचा माजी स्टार गोलंदाज मॉर्ने मॉर्कलची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याची माहिती दिली. बांगलादेश सिरीजपासून मॉर्ने मॉर्कल टीम इंडियासोबत जोडला जाणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात टेस्ट मालिका खेळवली जाणार आहे. 19 सप्टेंबर रोजी पहिला सामना खेळवला जाईल.



गंभीरने केलं होतं कौतूक


मॉर्ने मॉर्केल हा मी आजवर सामना केलेला सर्वात घातक गोलंदाज आहे. त्यामुळेच आम्ही त्याला केकेआरमध्येही घेतलं होतं. मला वाटले की तो माझ्यासमोरील सर्वात कठीण गोलंदाज आहे. तो दिल्लीकडून खेळत असतानाही, प्रत्येक वेळी जेव्हा मी त्याचा सामना केला, तेव्हा तो आमच्या संघात असावा असं मला वाटत होतं, असं गौतम गंभीरने मॉर्ने मॉर्कलसाठी म्हटलं होतं.


IND vs BAN मालिकेचं शेड्यूल 


भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नईत तर दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. दुसरा सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत तर तिसरा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल.


बांगलादेशविरुद्ध भारताचा संभाव्य स्कॉड


रोहित शर्मा (C), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान (WK), ऋषभ पंत (WK), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.