Unique Cricket Facts: आपल्या सामान्य जीवनशैलीमध्ये, विविध प्रकारचे योगायोग घटू शकतात. काही खरोखर आनंदी असतात, तर काही जण आपल्याला निराश करतात. तसेच काही खरोखरच धक्कादायक असू शकतात. याचदरम्यान क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक आवडीचा खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम झाले आणि मोडले गेले. पण आज आम्ही तुम्हाला अशा तीन विक्रमांबद्दल सांगत आहोत ज्यांना चाहते अफवा मानतात. पण तुम्हालाही या रेकॉर्डबद्दल जाणून आश्चर्य वाटेल. हे असे कोणते रेकॉर्ड्स (records) आहेत जे फार कमी चाहत्यांना माहीत आहेत. (most interesting coincidences in cricket history )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका दिवसात कसोटी सामन्याचे चार डाव


एक कसोटी सामना 5 दिवसांसाठी खेळला जातो. तर काहीवेळा कसोटी सामना 2 किंवा अगदी तीन दिवसात संपलेला पाहिला असेल. पण कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एकाच दिवसात दोन्ही संघांच्या चारही डाव खेळण्याचा अनोखा विक्रम 2000 साली इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा पहिला डाव 267 धावांत गुंडाळला.


यानंतर त्याच दिवशी वेस्ट इंडिजने इंग्लंडला केवळ 134 धावांवर ऑलआउट केले आणि त्याच दिवशी वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 54 धावांवर आटोपला. यानंतर दुसऱ्या दिवशीच इंग्लंडचा दुसरा डाव सुरू झाला. दुसऱ्या दिवसाच्या खेळात दोन्ही संघांनी आपापल्या दोन्ही डाव खेळून इतिहास रचला होता.
  
एक ओव्हर 17 चेंडूत पूर्ण केले


क्रिकेटच्या नियमांनुसार एका ओव्हरमध्ये गोलंदाज 6 चेंडू टाकतो. परंतु एकदा गोलंदाजाने 17 चेंडूंचे ओव्हर टाकले. 2004 साली पाकिस्तान आणि बांगलादेश (Pakistan vs Bangladesh) यांच्यात झालेल्या सामन्यात ही घटना घडली होती. पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद सामीने एका षटकात 17 चेंडू टाकले. आजही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात लांब षटक म्हणून त्याची नोंद आहे. या षटकात त्याने 4 नो बॉल आणि 7 वाईड बॉल टाकले आणि एकूण 22 धावा दिल्या. ज्यात दोन चौकारांचाही समावेश होता.


वाचा : पाहा रोहितनं कोणावर टाकलाय इतका विश्वास, ज्याच्या बळावर  T-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी भारताकडे येऊ शकते


द्रविडने षटकारांची हॅट्ट्रिक केली


भारताचा माजी कर्णधार आणि विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) त्याच्या संथ फलंदाजीसाठी ओळखला जातो. चाहते त्याला षटकार मारण्यासाठी ओळखत नाहीत. पण राहुल द्रविडनेही सलग तीन षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. 2011 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात त्याने सलग तीन षटकार ठोकले होते.