मुंबई : क्रिकेट विश्वातील अतिशय महत्त्वाच्या बातमीनं सध्या अनेकांचं आणि विशेष म्हणजे क्रीडा रसिकांचं लक्ष वेधलं आहे. पुढील तीन वर्षांसाठी फँटसी गेमशी संबंधित मोबाईल प्रीमियर लीग अर्थात 'एमपीएल' MPL ला भारतीय क्रिकेट संघाची जर्सी आणि अन्य ड्रेससाठीचं स्पॉन्सर म्हणून निवडण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात BCCI बीसीसीआयशी संलग्न एका सदस्यानं सोमवारी यासंदर्भातील माहितीला दुजोरा देत आता एमपीएल हे नाईकी Nike ची जागा घेईल असं स्पष्ट केलं. 


नावाबाबत गोपनीयता राखण्याच्या अटीवर या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार पुरुष, महिला, ए टीम आणि अंडर-19 टीमसाठीच्या जर्सीवर नाईकीची जागा आता एमपीएल घेताना दिसणार आहे. 


nike नं २०१६ पासून २०२० पर्यंत पाच वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघासाठीचा करार केला होता. ज्यासाठी त्यांनी ३० कोटी रुपयांची रॉयल्टी त्यासोबतच ३७० कोटी रुपयेही दिले होते. सूत्रांच्या माहितीनुसार सद्यस्थितीला कोरोना काळाच कोमीही नाईकीनं दिलेली तितकी रक्कम भरण्यास तयार नव्हतं. 


 


बीसीसीआयचं नुकसान...


नाईकी मागील काही वर्षांपासून प्रत्येक सामन्यासाठी ८७ लाख रुपये देत होती. त्यामुळं बीसीसीयसाठी हे एक मोठं नुकसान असणार आहे. Adidas आणि puma या ब्रँड्सनंही लिलावासाठीचे फॉर्म घेतले होते. पण, ते या प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत.