रांची : भारताचा कूल कॅप्टन महेंद्र सिंग धोनी मुलीसोबतचे हलके फुलके क्षण सोशल मीडियाद्वारा हमखास शेअर करत असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या दिवाळीची धूम  सुरू आहे. आपल्याप्रमाणेच धोनी  आणि त्याची लेक झीवा देखील लाडूंवर ताव मारायला सज्ज झाली आहे. 



 


महेंद्र सिंग धोनीने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये झीवा आणि धोनी एकच लाडू तोंडासमोर धरून त्यावर ताव मारतात. हा व्हिडिओ स्लो मोशनमध्ये असल्याने अधिकच इंटरेस्टिंग  झाला आहे. 
इंस्टाग्रामवर या व्हिडिओखाली 'अटॅक ऑन बेसन का लड्डू' अशी कॅप्शन लिहली आहे. या व्हिडिओला तुफान व्हुज्स मिळाले आहेत.


दिवाळीनंतर २२ ऑक्टोबर पासून भारत - न्युझिलंड सामन्याला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी धोनी रांची मध्ये त्याच्या मुलीसोबत धमाल मस्ती करताना दिसत आहे. 


काही दिवसांपूर्वी भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान विराट कोहलीनेदेखील झीवा सोबतचा खास रियुनियनचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्येही झीवा विराटसोबत धम्माल करताना दिसली होती.