...आणि मैदानात संतापला धोनी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ७९ धावांची शानदार खेळी केली.
चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ७९ धावांची शानदार खेळी केली.
या सामन्यादरम्यान धोनीला जीवदान मिळाले आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा उचलत चांगली खेळी केली. जेव्हा धोनी एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना तो रनआऊट होता होता वाचला. त्याच्यासोबत केदार जाधव फलंदाजी करत होता.
२२व्या षटकांत हे घडले. मार्कस स्टोयनिस आपले चौथे षटक टाकत होता. यावेळी त्याने टाकलेल्या चेंडूवर धोनीने फटका मारला आणि तो वेगाने एकेरी धाव घेण्यासाठी धावला. यावेळी समोरुन केदार मात्र धाव घेण्यासाठी तयार नव्हता.
धोनी खेळपट्टीच्या मध्यभागी आल्यानंतर द्विधा मनस्थितीत अडकला. यावेळी हिल्टन कार्टराईटने स्टम्पच्या दिशेने फेकला. मात्र धोनीचे नशीब चांगले असल्याने चेंडू स्टम्पला लागला नाही. प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर धाव न घेतल्यामुळे धोनीने केदार जाधवच्या दिशेने नाराजीचा कटाक्ष टाकला.