दुबई : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएल 2021 च्या 47 व्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध मैदानात उतरताच इतिहास रचला. या लीगमध्ये 200 सामन्यांत कर्णधार म्हणून खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. या लीगमध्ये सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करणारा कर्णधार धोनी आहे, तसेच कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही आतापर्यंत केवळ माहीच्या नावावर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके आयपीएल 2021 च्या पहिल्या चारमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ बनलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने आयपीएलमध्ये 200 सामन्यांमध्ये कर्णधारपद मिळवून नवा इतिहास रचला आणि असे करणारा तो पहिला कर्णधारही आहे. या लीगमध्ये सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करणारा कर्णधार धोनी आहे आणि कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. धोनीनंतर या लीगमध्ये सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करणारा कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीने आतापर्यंत 136 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे, तर गौतम गंभीरने 129 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे आणि तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने एकूण 127 सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळले आहे आणि तो या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे तर अॅडम गिलख्रिस्ट 74 सामन्यांत कर्णधारपदासह पाचव्या स्थानावर आहे.


आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करणारे 5 कर्णधार


200 - एम.एस धोनी


136 - विराट कोहली


129 - गौतम गंभीर


127 - रोहित शर्मा


74 - अॅडम गिलख्रिस्ट


याआधी धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली 199 सामन्यांपैकी 119 सामने जिंकले होते आणि 79 सामने गमावले होते. धोनीच्या विजयाची टक्केवारी 60.10 टक्के आहे. विराट कोहलीने 136 पैकी 62 सामने जिंकले आहेत, तर गौतम गंभीरने 129 पैकी 71 सामने जिंकले आहेत.