मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 7 वा सामना चेन्नई विरुद्ध लखनऊ खेळवण्यात आला. या सामन्यात के एल राहुलच्या टीमने चेन्नईचा धोबीपछाड केला. चेन्नईचे अनुभवी खेळाडूही त्यांची तुफान फलंदाजी पाहात राहिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना चाहत्यांसाठी खूप रोमांचित आणि एंटरटेनिंग होता. यामध्ये धोनीच्या टीममधील घातक बॉलरने मुंबईच्या मलिंगाचा रेकॉर्ड मोडला आहे. हा नवा विक्रम आणि मलिंगाचा रेकॉर्ड मोडणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 


ड्वेन ब्रावोचा अनोखा विक्रम
चेन्नईचा ऑलराऊंडर आणि भरवशाचा खेळाडू म्हणून ड्वेन ब्रावोकडे पाहिलं जातं. आयपीएलमध्ये त्याने अनोखा विक्रम केला आहे. 38 वर्षांचा ब्रावो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला. दीपक हुड्डाला आऊट करताच त्याच्या नावावर या विक्रमांची नोंद करण्यात आली. 


मुंबई इंडियन्सचा माजी बॉलर मलिंगाचा रेकॉर्ड त्याने मोडला आहे. मलिंगाने 170 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा रेकॉर्ड ब्रावोने मोडला आहे. चेन्नईने 200 हून अधिक धावा केल्या मात्र तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 


मलिंगाने 122 आयपीएलचे सामने खेळून 170 विकेट्स घेतल्या. तर ब्रावोने 153 सामने खेळून 171 विकेट्स घेतल्या आहेत. त्याखालोखाल अमित मिश्रा, पीयूष चावला आणि हरभजन सिंगचं लिस्टमध्ये नाव आहे. 


IPL मध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा खेळाडू
ड्वेन ब्रावो, सामने- 153 विकेट्स-  171
लसिथ मलिंगा सामने- 122 विकेट्स-  170
अमित मिश्रा सामने- 154  विकेट्स-  166
पीयूष चावला सामने- 165 विकेट्स-  157
हरभजन सिंग  सामने- 163 विकेट्स-  150


चेन्नई टीम गेल्या हंगामाएवढा मजबूत खेळताना दिसत नाही. पहिल्या सामन्यातही चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईचा सलग दुसरा पराभव आहे. 200 हून अधिक धावांचं लक्ष्य ठेवूनही चेन्नईला विजय मिळवता आला नाही.