मुंबई: देशात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे आणि बायो बबलमध्ये कोरोना घुसल्यानं IPLचे 31 उर्वरित सामने स्थगित करण्यात आले आहेत. त्यानंतर कॅप्टन कूल सह चेन्नई संघातील सर्व खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. रविंद्र जडेजा घोड्यांसोबत वेळ घालवताना दिसत आहे तर धोनीने देखील आपल्या घरी सुंदर घोडा आणला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीला श्वान खूप जास्त आवडतात. त्यांच्यासोबत वेळ घालवणं त्याला खूप आवडतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये धोनीचा लूक थोडा वेगळा आहे. त्याची दाढी वाढलेली आहे. तो आपल्या श्वानांसोबत खेळत आहे.






महेंद्रसिंग धोनीचा एक फोटो मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरवात केली. काही लोक म्हणू लागले की हा धोनीचा लेटेस्ट फोटो आहे का? धोनीचा हा लूक पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले. धोनीच्या चेहर्‍यावर एक मोठी पांढरी दाढी दिसते.


काही लोकांनी हा फोटो जुना असल्याचा दावा केला आहे. धोनीचा हा लूक पाहून चाहते खूप शॉक झाले आहेत. या लूकवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. 


जुलै 2019 मध्ये धोनीने न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कप उपांत्य फेरीत आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीच्या नेतृत्वात 2007 रोजी भारताने आयसीसी वर्ल्ड टी -20 क्रिकेट वर्ल्ड कप 2011 आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये  जिंकली आहे.