नवी दिल्ली :  नेहमी आपल्या तुफान फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी चर्चेत असणारा भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या रिटायर्टमेंटच्या मुद्द्यावरून चर्चेत आहे. पण माहीने अशी चर्चा करणाऱ्यांना आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 न्यूझीलंड विरुद्धचा दुसऱ्या टी २० सामन्यातील धोनीच्या खेळानंतर त्याच्यावर निवृत्ती घेण्यासाठी दबाव टाकला जाऊ लागला. धोनीने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली पाहिजे असे म्हणणाऱ्यांमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांचा समावेश होता. 


आगरकर बरसला


टीम इंडियाचा माजी बॉलर अजित आगरकर याने एका मुलाखतीत म्हटले की, धोनीच्या जागी आता दुसऱ्या प्लेअरला संधी देण्याची वेळ आली आहे. वन-डे क्रिकेटमध्ये धोनीची भूमिका योग्य आहे मात्र, टी-२० क्रिकेटमध्ये वेगळी आहे. तुम्ही जोपर्यंत टीमचे कॅप्टन असता तोपर्यंत सर्व ठिक आहे. 


विरु पाठीशी


मात्र, सध्या एक बॅट्समन म्हणून आम्ही त्याला मिस करत आहोत. तर धोनी योग्य वेळ आल्यावर निवृत्ती घेईल आणि तरुण खेळाडूंनी संधी देईल अशी भूमिका माजी बॅट्समन विरेंद्र सेहवाग याने घेतली आहे. 


प्रत्येकाचा विचार वेगळा


‘प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो आणि त्यांचे दृष्टीकोनही वेगळे असतात. त्यांच्या (टीकाकारांच्या) विचारांचा आपण सन्मान करायला हवा,’ अशा शब्दात धोनीने टीकाकारांना उत्तर दिले आहे. खलीज टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत माहिने हे वक्तव्य केले आहे. 


चाहते पाठीशी


 न्यूझीलंड विरोधातील दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर महेंद्रसिंद धोनीला आता टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घ्यायला हवी अशी मागणी होऊ लागली. धोनीने निवृत्ती घ्यायला हवी असं काही क्रिकेटर्सने म्हटलं तर काहीजण धोनीच्या पाठीशी उभे राहिले.