व्हिडिओ : धोनीला स्टंट करताना पाहिलं नसेल तर आत्ता पाहा...
`हे केवळ मस्तीसाठी आहे... याला तुम्ही घरी आजमावू शकता`
मुंबई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि तुफान बॅटसमन महेंद्रसिंह धोनी इंग्लंडहून भारतात परतलाय. धोनी सध्या आपल्या घरी रांचीमध्ये सुट्टीचा आनंद घेतोय. धोनीनं नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये तो सायकल स्टंट करताना दिसतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतो.
धोनीचा हा स्टंट आत्तापर्यंत २७ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. 'हे केवळ मस्तीसाठी आहे... याला तुम्ही घरी आजमावू शकता' असं कॅप्शन या व्हिडिओला त्यानं दिलंय. ॉ
या व्हिडिओत केवळ बनियान आणि पायजमा घातलेला धोनी डोळ्यांवर काळा चष्मा आणि कानांवर हेडफोन लावलेला दिसतो. धोनी एका छोट्या सायकलवर स्वार झालाय... आणि लाकडाचा एक काठी त्यानं आपल्या तोंडात पकडून ठेवलीय... हा व्हिडिओ स्लो मोशनमध्ये आहे.