MS Dhoni In IPL 2025 : आगामी आयपीएलसाठी आता बीसीसीआयने मोठी पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. आयपीएल 2025 पूर्वी मेगालिलाव पार पडेल. यामध्ये फ्रँचायझींच्या निर्णयाचा कस लागेल. मोठ्या खेळाडूंना संघात कायम ठेवलं जाणार की नाही? असा सवाल सध्या विचारला जातोय. अशातच आता बीसीसीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे. बीसीसीआय 5 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूला 'अनकॅप्ड' खेळाडूंच्या श्रेणीतून खेळण्याची परवानगी देणारा नियम मंजूर करण्याची शक्यता आहे.


CSK ला मोठा दिलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने असा नियम लागू केला तर, असे खेळाडूने ज्यांनी पाच वर्ष किंवा त्याहून अधिक वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली आहे, असे खेळाडू अनकॅप खेळाडू म्हणून ओळखले जातील. यामध्ये चेन्नईचा थाला महेंद्रसिंग धोनीचा देखील समावेश आहे. धोनीला चेन्नईसोबत कायम ठेवता यावं, यासाठी चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने बीसीसीआयसोबत झालेल्या बैठकीत मागणी केली होती. सीएसकेला या नियमाद्वारे धोनीला आगामी हंगामासाठी त्यांच्यासोबत कायम ठेवायचे आहे. 


बीसीसीआयने हा नियम लागू केला तर त्याचा सर्वाधिक फायदा चेन्नईला होणार आहे. हा नियम लागू झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवू शकेल. सर्वप्रथम हा नियम 2008 ते 2021 दरम्यान लागू होता, नंतर तो रद्द करण्यात आला होता. धोनीने आयपीएल 2025 मध्ये खेळण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, मात्र हा नियम लागू झाला तर धोनीसारखा रान मोकळं असेल. त्यामुळे धोनी चाहत्यांना नाराज करू शकणार नाही.


धोनी काय म्हणाला...


आयपीएल ऑक्शनपूर्वी बीसीसीआय प्लेयर्सच्या रिटेन्शनवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशातच चेन्नईचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीने मोठं वक्तव्य केलं होतं. खेळाडू कायम ठेवण्याबाबत (रिटेन्शन) बीसीसीआय काय निर्णय घेतात? हे पाहावे लागेल. सध्या चेंडू आमच्या कोर्टात नाही, असं धोनी म्हणतो. एकदा का नियम आणि नियमांची औपचारिकता झाली की, मी कॉल घेईन पण संघाच्या हितासाठी असेल, असं धोनी म्हणाला होता.


दरम्यान, गेल्या वर्षी एम एस धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्याआधी धोनीने आयपीएल सिझनमध्ये एकूण 161 रन्स केले होते. धोनीने फक्त महत्त्वाच्या क्षणी फलंदाजी येत असल्याने तो पुढील आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता थाला चेन्नईच्या समर्थकांना दिलासा देणार का? की निवृत्ती जाहीर करणार? अशा प्रश्नांची सध्यातरी निरुत्तरीत आहेत.