`गुलाबी शरारा` गाण्यावर थिरकला MS Dhoni, पत्नीसह केलं पारंपरिक नृत्य, मजेशीर Video पाहिलात का?
MS Dhoni Viral Dance : सध्या धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात यात धोनी आपल्या मित्र परिवारासोबत गुलाबी शरारा या गाण्यावर पारंपरिक पहाडी नृत्य करत आहे.
MS Dhoni Viral Dance : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली, मात्र तरी देखील धोनीची फॅन फॉलोईंग किंचितही कमी झालेली नाही. सध्या धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात यात धोनी आपल्या मित्र परिवारासोबत गुलाबी शरारा या गाण्यावर पारंपरिक पहाडी नृत्य करत आहे.
देहरादूनची सफर करतोय धोनी :
एम एस धोनी सध्या त्याचे कुटुंब आणि मित्रांसोबत हिमाचल दौऱ्यावर आहे. तेथे तो सुट्ट्यांचा आनंद घेत असून देहरादूनमधील अनेक ठिकाण देखील पाहतोय. धोनीच्या या ट्रिपचे काही फोटो आणि व्हिडीओ त्याचे फॅन्स सोशल मीडियावर टाकत आहेत. सध्या व्हायरल होतं असलेल्या व्हिडीओमध्ये धोनी हिमाचलमधील पारंपरिक पहाडी नृत्यात सहभागी झालेला दिसतोय. पारंपरिक नृत्य करणाऱ्या ग्रुप सोबत धोनी, पत्नी साक्षी आणि इतर मित्रमंडळी गुलाबी शरारा या गाण्यावर थिरकताना दिसतोय. गुलाबी शरारा हे हिमाचलच्या एका गायक संगीतकाराने तयार केलेलं गाणं मध्यंतरी देश विदेशात खूप प्रसिद्ध झालं होतं. धोनीचा हा नवा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असून चाहते त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
आयपीएल 2025 मध्ये दिसणार एम एस धोनी :
एम एस धोनी हा जवळपास 4 वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त झालेला असला तरी तो अजूनही इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो. धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळणार की नाही यावर अनेक प्रश्नचिन्ह होते, मात्र चेन्नई सुपरकिंग्सने ऑक्शनपूर्वी धोनीला रिटेन केल्याने तो आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसणार हे आता निश्चित झालंय. सीएसकेचा कर्णधार असलेल्या धोनीने गेल्यावर्षी कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले होते. सध्या मी माझ्या क्रिकेट करिअरमधील शेवटचे दिवस एन्जॉय करतोय असं धोनीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.
CSK ने कोणावर खर्च केले सर्वाधिक पैसे?
आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमधून चेन्नईने एकूण 20 खेळाडूंना विकत घेतले. ऑक्शनसाठी चेन्नईच्या पर्समध्ये 55 कोटी रुपये शिल्लक होते. यापैकी चेन्नई सुपरकिंग्सने फिरकी गोलंदाजांसाठी सर्वाधिक रक्कम खर्च केली. यात नूर अहमदसाठी 10 कोटी तर रविचंद्रन अश्विनसाठी 9.75 कोटी खर्च केले. तर सीएसकेने मिडल ऑर्डर आणि ऑलराउंड खेळाडूंना देखील ऑक्शनमधून निवडले. यात राहुल त्रिपाठीसाठी 3.40 कोटी, सॅम करन करता 2.40 कोटी रुपये खर्च केले. तर रचिन रवींद्रसाठी RTM कार्ड वापरून 4 कोटी मोजून त्याला संघात घेतले. सीएसकेने डेवोन कॉन्वेसाठी 6.25 कोटी रुपये खर्च केले. तर ऑक्शनपूर्वी ऋतुराज गायकवाड (18 कोटी) , शिवम दुबे (12 कोटी) , रवींद्र जडेजा (18 कोटी), मथीशा पथिराना (13 कोटी) आणि एम एस धोनीला (4 कोटी) रिटेन केले होते.