मुंबई : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतो. त्यामुळे धोनी त्याच्याविषयीचे बरेचसे अपडेट इन्स्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करतो. सध्या धोनी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतोय. याचे काही फोटो आणि व्हिडीओही धोनीने त्याच्या चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या धोनीचा पाणीपुरीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत क्रिकेटपटू पियुष चावला आणि माजी क्रिकेटपटू आरपी सिंगही आहे. या दोघांना धोनी स्वत:च्या हाताने पाणीपुरी तयार करुन देतांना दिसतोय. या व्हिडीओमध्ये आरपी सिंह मुद्दाम धोनीला पाणीपुरी लवकर देण्याची घाई करत आहे. तर धोनीदेखील पहिल्यांदाच असं काम करत असल्यामुळे थोडा वेळ थांब, वेळ लागेल, असं म्हणताना दिसतोय.


२०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलनंतर धोनी क्रिकेटच्या मैदानात दिसला नाही. यापुढे धोनी भारताकडून क्रिकेट खेळेल का नाही? याबाबत साशंकता आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या भविष्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.


आयपीएलमधली धोनीची आणि इतर विकेट कीपरची कामगिरी बघावी लागेल. आयपीएलमध्ये धोनी फॉर्ममध्ये असेल आणि इतर विकेट कीपरची कामगिरी खराब झाली, तर धोनीला टी-२० वर्ल्ड कपसाठी संधी आहे. सगळं काही आयपीएलच्या कामगिरीवर अवलंबून आहे, असं रवी शास्त्री म्हणाले होते. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे.