लष्करी गणवेशात धोनी पाहा काय करतोय
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या सेवेत आहे.
मुंबई : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या सेवेत आहे. लष्करासाठी ऑन ड्यूटी असताना धोनी लोकांचं मन जिंकण्याचाही प्रयत्न करत आहे. काश्मीरमधून धोनीचे जवळपास रोज एक-एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये धोनी जवानांसोबत व्हॉलीबॉल खेळताना दिसला. तर बूट पॉलिश करतानाही दिसला. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये धोनी गाणं म्हणताना दिसत आहे. लष्कराचा गणवेश घातलेला धोनी मुकेश यांचं 'मैं पल दो पल का शायर हूं' हे गाणं म्हणत आहे. पण हा व्हिडिओ कधीचा आहे, याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही.
लष्कराचं काम करण्यासाठी धोनीने बीसीसीआयकडून २ महिन्यांची विश्रांती मागितली. ३१ जुलैला धोनी ड्यूटीवर गेला. १५ ऑगस्टपर्यंत धोनी त्याच्या बटालियनसोबत राहिल.
२०११ साली लष्कराशी जोडला गेलेला धोनीने ट्रेनिंग कॅम्पमध्ये विमानातून पॅरेशूटमधून ५ उड्या मारून अधिकृत पॅराट्रूपरही बनला. लष्कराचं काम करताना धोनीला पेट्रोलिंग, गार्ड आणि पोस्ट ड्यूटीची जबाबदारी देण्यात आली आहे.