दुबई :   भारताचा कूल कॅप्टन आणि अष्टपैलू खेळाडू निवृत्तीनंतर तरूणांना क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याच्या तयारीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही वृत्तांनुसार, धोनी लवकरच दुबईमध्ये क्रिकेट अ‍ॅकॅडमी उघडणार आहेत. गल्फ न्यूज च्या रिपोर्टनुसार, महेंद्रसिंग धोनी आणि पॅसिफिक स्पोर्ट्स क्लबमध्ये करार झाला आहे. 


पॅसिफिक व्हेंचरच्या परवेझ खानने धोनीच्या या कराराबद्दल माहिती देताना सांगितले की,' या अ‍ॅकॅडमीचे नाव महेंद्रसिंग धोनी अ‍ॅकॅडमी ठेवण्यात येईल.  त्याचे सारे अधिकार पॅसॅफिक व्हेंचर क्लबकडे असतील. यासोबतच ही अ‍ॅकॅडमी दुबई, इतर गल्फ देश व यूके मधील तरूणांनाही प्रशिक्षण देईल. तसेच त्या देशांमध्येही अ‍ॅकॅडमी उघडली जाईल. 


महेंद्रसिंग धोनीसोबतच इतरही काही खेळाडू या अ‍ॅकॅडमीचा भाग आहेत. यामध्ये विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग या खेळाडूंचा समावेश असेल. धोनीने पूर्णपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो  स्वतः या अ‍ॅकॅडमीमध्ये तरूणांना प्रशिक्षण देईल.