मुंबई : जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू शत्रूंशी समर्थपणे लढण्यासाठी एकांतात अभ्यास करणे पसंत करतात. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही याला अपवाद नाही. काही दिवसांतच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जातोय. या दौऱ्यावर जाण्याआधी धोनी यासाठी चांगलाच घाम गाळतोय. सचिन तेंडुलकरही आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरच्या काही वर्षात मुंबईच्या बांद्रा कुर्ला परिसरात सराव करत होता.  एनसीएमध्ये धोनीनेही असाच सराव सुरु केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड दौऱ्यासाठी धोनी चांगलीच तयारी करतोय. यावेळी धोनीने शेकडो बॉलचा सामना केला. यातील ७० टक्के सराव थ्रो डाऊनने केला. धोनीने १५ जूनला वनडे टीमसोबतच्या खेळाडूंसोबत योयो टेस्ट दिली. या टेस्टमध्ये धोनी पास झालाय. धोनीने आज एनसीएमध्ये थ्रो डाऊन तज्ञ रघू आणि वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरसह अभ्यास केला. त्याने अडीच तास केवळ थ्रो डाऊनचा सराव केला.


सलग दोन तास सराव केल्याने धोनी छोटासा ब्रेक घेई आणि त्यानंतर पुन्हा सराव सुरु करे. यादरम्यान सिद्धार्थ कौलही तेथे आला आणि त्याने धोनीला गोलंदाजी केली.