मुंबई : टीम इंडियाला 2007 च्या वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली होती. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेशने टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे टीम इंडियाचा 2007 मधील वर्ल्ड कपमधील प्रवास तिथेच संपला. टीम इंडियाला बांगलादेशकडून पराभव अन् विश्व चषकातील आव्हान संपुष्ठात आल्याने टीम इंडियाला क्रिकेट चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. क्रिकेट चाहते भयंकर आक्रमक झाले. (ms dhoni traveled to police van due to world cup 2007 loss)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहते रस्त्यावर उतरुन खेळाडूंचे प्रतिकात्मक  पुतळे जाळू लागले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. खेळाडूंमध्ये भितीची भावना वाढीस लागली होती. त्यामुळे धोनीला सुखरुप पोहचवण्यासाठी पोलिसांच्या गाडीचा आधार घ्यावा लागला होता. पोलिसांनी धोनीला दिल्ली विमानतळावरुन गाडीत बसवलं. असा बाका प्रसंग धोनीवर ओढावला होता. त्यावेळेस मला अपराध्यासारखं वाटलं असल्याचं धोनी म्हणाला होता. याबाबतचा किस्सा स्वत: धोनीने एका कार्यक्रमात सांगितला होता.  


धोनी काय बोलला?


"आम्ही दिल्ली विमानतळावर उतरलो. बाहेर परिस्थिती प्रचंड गंभीर होती. अशा वेळेस पोलिसांनी आम्हाला त्यांच्या गाडीत बसवलं. गाडीत माझ्या सोबत वीरेंद्र सेहवागही होता. साधारण संध्याकाळची ती वेळ होती. आम्ही 60 ते 70 च्या वेगाने जात होतो. यावेळेस माध्यमांच्या गाड्याही भले मोठे कॅमेरे गाडीवरुन लावून आमचा पाठलाग करत होती. यामुळे आम्ही जणू काय अपराधच केलाय असं वाटू लागलं", असं धोनीने नमूद केलं.   


"काही वेळेनंतर पोलिसांनी आम्हाला सुखरुप पोलीस चौकीत पोहाचावलं. त्यानंतर आम्ही 15-20 मिनिटं थांबलो. त्यानंतर आम्ही स्वत:च्या गाडीने मार्गस्थ झालो", असं धोनीने सांगितलं.