नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीला श्रीलंकेत सुरू असलेल्या निडास ट्रॉफीसाठी आराम देण्यात आला आहे, पण या दरम्यान धोनी आपल्या परिवारासोबत काही वेळ घालवत आहे. या दरम्यान धोनी काही कार्यक्रमांना देखील हजेरी लावताना दिसत आहे.


खेळासाठी फिटनेसही महत्वाचा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच एका कार्यक्रमादरम्यान, धोनीने विश्वचषक स्पर्धेसाठी, मुलांना खेळण्यासाठी फिटनेसशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या, धोनीने कार्यक्रमादरम्यान सांगितलं, भारतीय खेळात पुढे आहेत, पण फिटनेसमध्ये मागे पडतात. खेळासाठी फिटनेसही महत्वाचा आहे, यूपीतील गोलंदाज स्विंग करण्यात आघाडीवर असतात असं धोनीने म्हटलं आहे.


विश्वचषकासाठी धोनी फीट


धोनीने आपण पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी फीट असल्याचं सांगितलं, यासाठी मी तयारी देखील करणार आहे, असं देखील धोनीने सांगितलं. धोनी म्हणत होता, जर मी फीट राहिलो नसतो, तर आतापर्यंत क्रिकेट खेळणं मुश्कील राहिल असतं.



एसीत वाढलेली मुलं कमी पडतात


धोनीने कार्यक्रमादरम्यान सांगितलं, आई-वडिल मुलांना स्टेडियमपर्यंत पोहचवत आहेत, पण त्यांच्याकडून मेहनत देखील करून घेत आहेत. एसीचा वापर आणि त्यासारख्या तमाम सुविधांमुळे मुलांचा स्टॅमिना संपत चालला आहे. काही वर्षानंतर त्यांचं शरीर बोलू लागतं, असं सांगत त्याने चिंता व्यक्त केली.


धोनीचा चाहता असा नतमस्तक झाला


या कार्यक्रमात एक मुलांना आणि मोठ्यांना धोनी विषयीचं प्रेम पाहायला मिळालं, कारण कार्यक्रमादरम्यान एका मुलाला स्टेजवर बोलावण्यात आलं, तेव्हा धोनीला पाहाताच त्याने लोटांगण घातलं. जमीनीवर झोपून हा मुलगा धोनीच्या पाया पडला, धोनीने आपल्या या फॅनची गळाभेट घेतली आणि एक गिफ्टही दिलं.