मुंबई : पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ३ रननी रोमहर्षक विजय झाला. या विजयामुळे मुंबईचं प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं आव्हान अजूनही कायम आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला त्यांची शेवटची दिल्लीविरुद्धची मॅच जिंकावी लागेल. पण शेवटची मॅच मुंबई हारली तर दुसऱ्या टीमच्या कामगिरीवर मुंबईला अवलंबून राहावं लागेल. हैदराबाद आणि चेन्नईची टीम याआधीच प्ले ऑफसाठी क्वालिफाय झाली आहे. तर १२ मॅचपैकी ७ मॅच जिंकणारी कोलकात्याची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. १३ मॅचमध्ये ६ मॅच जिंकत मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान आणि पंजाबनंही १३ पैकी ६ मॅच जिंकल्या आहेत. पण नेट रनरेट चांगला असल्यामुळे मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या आणि पंजाब सहाव्या क्रमांकावर आहे. बंगळुरूनं १२ पैकी ५ मॅच जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात १० पॉईंट्स आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्तापर्यंतच्या १० आयपीएलमध्ये कोणतीही टीम १२ पॉईंट्सवर प्ले ऑफमध्ये क्वालिफाय झालेली नाही. पण यावर्षी मात्र मुंबईला हे रेकॉर्ड करत प्ले ऑफ गाठण्याची संधी आहे. त्यासाठी यापुढच्या मॅचमध्ये खालीलप्रमाणे निकाल लागणं आवश्यक आहे.


- हैदराबादकडून बंगळुरूचा पराभव


- बंगळुरूकडून राजस्थानचा पराभव


- दिल्लीकडून मुंबईचा पराभव


- चेन्नईकडून पंजाबचा पराभव


या मॅचचे निकाल अशाप्रकारे लागले तर मुंबई १२ पॉईंट्ससह प्ले ऑफमध्ये जाऊ शकते. मुंबईचा नेट रनरेटही चांगला असल्यामुळे याचाही फायदा टीमला होणार आहे.