यशस्वी बॉलर म्हटलं जाणाऱ्या यॉर्कर किंग बुमराहच्या नावावरही `नकोसा` रेकॉर्ड
कोणत्याही बॉलरला हा रेकॉर्ड आपल्या नावावर असू नये असंच वाटले, पाहा बुमराहच्या नावावर कोणता लाजीरवाणा रेकॉर्ड
मुंबई : IPL मध्ये बरेच चांगली आणि काही वाईट रेकॉर्ड होत असतात. जसे फलंदाजांच्या नावावर रेकॉर्ड होतात तसेच गोलंदाजांच्याही नावावर रेकॉर्ड आहेत. यॉर्कर किंग म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला जसप्रीत बुमराहच्या नावावरही एक अजब रेकॉर्ड आहे.
हा रेकॉर्ड असा आहे जो प्रत्येक बॉलर्स आपल्या नावावर कधीही होऊ नये असं वाटत असेल. असा लाजीरवाणा रेकॉर्ड जसप्रीत बुमराहच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज बुमराहच्या नावावर असा कोणता लाजीरवाणा विक्रम आयपीएलमध्ये नोंदवण्यात आला जाणून घेऊया.
बुमराहच्या या लाजीरवाण्या विक्रमामुळे काहीवेळा टीम इंडियालाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. बुमराह सध्या मुंबई संघाकडून खेळतो. त्याने आयपीएलमध्ये 106 सामने खेळले आहेत. मुंबईची कमान नेहमी बुमराहच्या खांद्यावर असते.
आयपीएलमध्ये सर्वात जास्त नो बॉल टाकण्याचा लाजीरवाणा विक्रम बुमराहच्या नावावर आहे. आतापर्यंत 27 नो बॉल टाकले आहेत. बुमराहच्या खालोखाल श्रीसंतने 23 नो बॉल टाकले आहेत.
बुमराह आणि श्रीसंत यांच्यानंतर अमित मिश्रा आणि ईशांत शर्मा यांनी 21 वेळा नो बॉल टाकले आहेत. यांची नावं विभागून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आयपीएलमध्ये सर्वात जास्त नो बॉल टाकण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर आहे.
बुमराहने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याने 106 सामने खेळून 130 विकेट्स घेतल्या आहेत. 2022 च्या पंधराव्या हंगामासाठी बुमराहला मुंबई संघाने 12 कोटी रुपये देऊन रिटेन केलं.
आयपीएलच्या 14 व्या हंगामात बुमराहने उत्तम कामगिरी केली होती. त्याने 14 सामने खेळून 21 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर मुंबई संघाने त्याला ऑक्शनपूर्वी रिटेन केलं. 27 मार्च रोजी दिल्ली विरुद्ध मुंबई पहिला सामना होणार आहे. यंदाच्या हंगामात नराइजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स आणि गुजरात टाइटन्स