Jasprit Bumrah Replacement: आजपासून क्रिकेटची सर्वात मोठी लीग आयपीएलला (IPL 2023) सुरुवात झाली आहे. पहिला सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यामध्ये रंगणार आहे. मात्र सर्वांचं लक्ष रविवारी असलेल्या मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्या सामन्यावर आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने एक मोठी घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्स टीमने शुक्रवारी टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) रिप्लेसमेंटबाबत मोठी माहिती दिली. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रित बुमराह जो दुखापतीमुळे आयपीएलच्या सिझनमधून बाहेर पडला. दरम्यान मुंबईकडून ही घोषणा 16वा सिझन सुरू होण्यापूर्वी करण्यात आली होती.


बुमराहला 'हा' खेळाडू करणार रिप्लेस


इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाज बुमराहच्या जागी संदीप वॉरियरचा (Sandeep Warrier) समावेश कऱण्याचा निर्णय घेतला आहे. संदीप वॉरियर हा भारताकडून खेळला असून त्याने फक्त एकच T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलाय. 


संदीप वॉरियरचं आयपीएल कारियर पाहिलं तर 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने त्याला टीममध्ये घेतलं होतं. मात्र यावेळी 2013-2015 दरम्यान त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर आरसीबीने त्याला रिलीज केलं. 2019 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केलं. यावेळी 2019, 2020 आणि 2021 दरम्यान त्याला फक्त 5 सामने खेळण्याची संधी दिली.


मुंबई इंडियन्सची कमान कोणाकडे?


16 व्या सिझन सुरु होण्यापूर्वी गुरुवारी सर्व कर्णधारांचं ट्रॉफीसोबत फोटोशूट केलं गेलं. यावेळी रोहित शर्मा उपस्थित नसल्याने तो आयपीएलबाहेर गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र यानंतर टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, रोहित शर्मा आजारी पडला असल्याची माहिती मिळाली. दरम्यान बीसीसीआयच्या वर्कलोड मॅनेजमेंटनुसार, रोहित शर्मा आयपीएल 2023 चे काही सामने खेळणार नाही. त्यावेळी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईच्या टीमची कमान रोहित शर्माकडे असणार आहे.