IPL 2024, Mumbai indians : आयपीएल तोंडावर असताना आता मुंबई इंडियन्स संघामध्ये मोठे बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ (Jason Behrendorff) जखमी असल्याने पलटणने बेहरेनडॉर्फच्या जागी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ल्यूक वुडची (Luke Wood) निवड केली. ल्यूक वुड 50 लाख रुपये देऊन मुंबई कॅम्पमध्ये सामील झाला आहे. 2022 मध्ये त्याने टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, या इंग्लंडच्या जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. अशातच आता वूड आयपीएलमध्ये (IPL 2024) कहर करणार का? असा सवाल विचारला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सला दुखापतीचं ग्रहण


बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज मधुशंका जखमी झाला होता. एमआरआय स्कॅनमध्ये हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीची पुष्टी झाल्याचे श्रीलंका क्रिकेटनं सांगितलंय. यामुळे मदुशंका पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर राहू शकतो, अशी माहिती समोर आली होती. अशातच आता जेसन बेहरेनडोर्फ देखील दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.


दरम्यान, ल्यूक वुडने अलीकडेच पाकिस्तान सुपर लीग 2024 मध्ये भाग घेतला होता. तो बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पेशावर झल्मी संघात होता. आता पाकिस्तानी लीग खेळल्यानंतर वुड आयपीएलमध्ये सामील झाला आहे. ल्यूक वुडने आतापर्यंत एकूण 140 टी-20 सामने खेळले असून 147 विकेट्स घेतल्या आहेत. ल्यूक वुडने 62 प्रथम श्रेणी सामन्यात 137 विकेट घेतल्या आहेत.



IPL 2024 साठी मुंबई इंडियन्सचा संघ - 


हार्दिक पंड्या (क), रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, एन. तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.