WPL 2024: वुमेंस प्रिमीयर लीगच्या दुसऱ्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरूने मुंबई इंडियन्सचा 5 रन्सने पराभव करत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. या सोबत आरसीबीच्या टीमचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अजून जिवंत आहे. फायनलच्या सामन्यात आता बंगळूरूचा दिल्लीशी सामना होणार आहे. त्यामुळे आरसीबी आता जेतेपद जिंकण्यासाठी केवळ एक पाऊल दूर आहे.


एलिसा पेरीची एकाकी झुंज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबीने टॉस जिंकला खरा मात्र मुंबईच्या गोलंदाजांसमोर आरसीबीच्या फलंदाज ढेपाळल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीची अवस्था मुंबईने 4 बाद 49 धावा अशी केली होती. स्मृती मंधान, सोफी डिव्हाईन, दिशा कसाट, रिचा घोष, सोफी मोलिनक्स झटपट बाद झाले. एलिस पेरीने मात्र एकाकी झुंज दिली. एलिस पेरीने 50 चेंडूत 66 धावांची खेळी केली. यात 8 चौकार आणि एका सिक्सचा समावेश आहे. 


बंगळूरूकडून 136 रन्सचं टारगेट


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजांना सुरुवातीला साजेसा खेळ करता आला नाही. मात्र तरीही एलिसाच्या खेळीच्या जीवावर सन्मानजनक धावा करण्यात यश आलं आहे. बंगळुरुने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमवून 135 रन्स केले आणि विजयासाठी 136 धावांचं आव्हान दिलं आहे. मात्र मुंबईला हे सोप्पं आव्हान पेलवलं नाही आणि 5 रन्सने सामना गमावला.


मुंबईच्या फलंदाज ठरल्या फेल


136 रन्सचं आव्हान पार करणं मुंबईच्या टीमला कठीण गेलं. यावेळी मुंबईची ओपनर यास्तिका भाटिया आणि हिली मॅथ्युजला चांगला खेळ करता आला नाही. नॅट सायव्हर-ब्रंटने टीमला जिंकवून देण्याचा प्रयत्न केला मात्र जॉर्जिया वेरेहमने तिची विकेट घेतली. नॅट सायव्हर-ब्रंटने 1 बॉल्समध्ये 23 रन्स केले. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने 30 बॉल्समध्ये 33 रन्सची खेळी केली. कौर मैदानात असताना मुंबईचा विजय शक्य मानला जात होता. मात्र कौरची विकेट गेली आणि उर्वरित फलंदाजांना विजय मिळवून देता आला नाही. अमेलिया करकडून विजयाची अपेक्षा होती मात्र तिला मोठे फटके मारता आले नाहीत.


मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11


हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, एस सजना, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग 11


स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर, जॉर्जिया वेरेहम, दिशा कासट, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.