IPL 2024 : हैदराबादच्या विजयाने मुंबई इंडियन्सचा `खेळ खल्लास`, यंदाच्या आयपीएल हंगामातून बाहेर
Mumbai Indians Eliminate from IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपर जाएन्ट्सचा 10 विकेट्सने पराभव केल्याने आता मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. कसं ते पाहा?
Mumbai Indians knocked out after SRH demolish LSG : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात प्रथमच लखनऊ सुपर जायंट्सचा (SRH demolish LSG) पराभव केला. हैदराबादने 10 गडी राखून हा ऐतिहासिक विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 ओव्हरमध्ये चार गडी गमावून 165 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना हैदराबाद संघाने 10 षटकांत म्हणजेच 9.4 ओव्हरमध्ये 166 धावांचे लक्ष्य गाठलं. हैदराबादने 62 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला अन् मोठ्या विक्रमाची नोंद केली. याच बरोबर हैदराबादने पाईट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर दुसरीकडे आता मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians Eliminate from IPL 2024) आयपीएलमधून पत्ता कट झालाय.
मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर
हैदराबादने लखनऊचा पराभव केल्यामुळे आता मुंबई इंडियन्स आयपीएलच्या यंदाच्या हंगामामधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. आजच्या विजयामुळे आता हैदराबादचा संघ 14 गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी अनुक्रमे कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी 16 -16 गुणांसह कायम आहे.
तर चेन्नई 12 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्याचबरोबर लखनऊ आणि दिल्लीच्या खात्यात देखील 12-12 गुण आहेत. येत्या 14 मे रोजी लखनऊ आणि दिल्लीचा सामना होईल. यात कोणतीही टीम जिंकली तरी त्यांचे 14 गुण होतील. सामना जरी ड्रॉ झाला तरी दोन्ही संघाकडे कमीतकमी 13-13 अंक गुण असणार आहेत. हेच गुण मुंबईच्या टोटल पेक्षा जास्त असतील.
मुंबई इंडियन्सच्या खात्यात आता 8 गुण आहेत. तर त्यांना अजून दोन सामने खेळायचे आहेत. मुंबई कितीही जोर लावला तरी मुंबईकडे 12 च गुण होतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुंबईला 13 गुण घेता येणार नाहीत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
दरम्यान, मुंबईप्रमाणेच उद्याच्या सामन्यात जो संघ पराभूत होईल तो थेट आयपीएलच्या हंगामातून बाहेर होणार आहे. उद्याचा सामना पंजाब आणि आरसीबी यांच्यात खेळवला जाणार आहे. हरणाऱ्या संघाला केवळ जास्तीत जास्त 12 गुणांवर पोहोचता येईल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी उद्याचा सामना करो या मरो असणार आहे.