मुंबई: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चेन्नईमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. IPL 2022 मध्ये 10 संघ खेळणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम सामील होणार आहेत. त्यामुळे यावेळी ऑक्शन मोठं असणार आहे. प्रत्येक संघाला 4 खेळाडू रिटेन करता येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली संघाकडून श्रेयस अय्यरला रिटेन करण्यात येणार नाही. त्यामुळे आता श्रेयस अय्यर कोणत्या संघात जाणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. एका रिपोर्टनुसार श्रेयस अय्यर रोहित शर्माच्या संघात जाण्याची शक्यता आहे. मुंबई संघ सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि हार्दिक पांड्याला डिच्चू देण्याच्या तयारीत आहे. 


सूर्यकुमार यादव किंवा ईशान किशनच्या जागी श्रेयस अय्यर मुंबई संघात येऊ शकतो. श्रेयस अय्यरने न्यूझीलंड विरुद्ध कानपूर इथल्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. अय्यरने कानपूरमध्ये शतक झळकवलं. त्यामुळे याचा फायदा घेऊन मुंबई संघ त्याला आपल्याकडे घेऊ शकतं.


टीम इंडियाच्या पहिल्या कसोटी सामन्यातून डेब्यू केलेल्या श्रेयस अय्यरला दिल्ली संघ रिटेन करणार नसल्याची चर्चा आहे. दिल्ली संघाने आपले चार खेळाडू निवडले आहेत. ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि  एनरिच नॉर्ट्जे या चार जणांना दिल्ली संघ रिटेन करणार आहे. 


IPL 2021 च्या सुरुवातीच्या टप्प्यात श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. त्यानंतर ऋषभ पंतला कर्णधारपद सोपवण्यात आलं. अय्यरने आयपीएल 2021 मध्ये दिल्लीसाठी 8 सामन्यात 175 धावा केल्या आहेत. अय्यर हा नेहमीच दिल्लीच्या फलंदाजीचा आधार राहिला आहे. अशा परिस्थितीत अय्यरला कायम न ठेवणे ही दिल्लीची मोठी चूक ठरू शकते.


या यादीमध्ये कुठेच श्रेयस अय्यरचं नाव नाही. दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरला दिल्ली संघ रिटेन करणार नाही अशीही एक चर्चा रंगली आहे. श्रेयस अय्यरने पहिल्या कसोटी सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याचा फायदा आता मुंबई इंडियन्स संघ घेणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.