मुंबई : आयपीएल 2022 मधील दुसरा सामना मुंबई विरुद्ध दिल्ली झाला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईला पहिल्या सामन्यात अपयश आलं आहे. पहिला सामना जिंकता आला नाही. दिल्लीने 4 विकेट्सनं मुंबईवर विजय मिळवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या पराभवाचं कारण गोलंदाज ठरल्याचं सांगितलं जात आहे. रोहितचा भरवशाचा खेळाडू आणि मॅच विनर बुमराहही यावेळी फ्लॉप ठरला. त्यामुळे मुंबई संघाला मोठा तोटा झाला आहे. 


बुमराहसोबत हे काय घडलं?
आयपीएलमध्ये एकापेक्षा एक घातक गोलंदाज आहेत. यामध्ये वेगवान आणि यॉर्कर किंग म्हणून बुमराह ओळखला जातो. बुमराह कमी धावा देऊन विकेट्स घेण्यासाठी ओळखला जातो. मात्र 15 व्या हंगामाची बुमराहची सुरुवात फार काही चांगली राहिली नाही. 


बुमराहने दिल्लीसाठी 3.2 ओव्हर गोलंदाजी केली. त्याने 43 धावा दिल्या पण एकही विकेट घेण्यात यशस्वी ठरला नाही. बुमराहला एकही विकेट घेण्यात यश आलं नाही. याचा तोटा मुंबई संघाला झाला आहे. 


IPL मध्ये बुमराहची कामगिरी
बुमराहने 2013 मध्ये आयपीएलमध्ये डेब्यू केला होता. मुंबई इंडियन्स संघात बुमराहला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 10 वर्षात एक यशस्वी गोलंदाज म्हणून बुमराहने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.


आयपीएलमध्ये  107 सामने खेळून 130 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. 2022 मध्ये मुंबईने 12 कोटी रुपये देऊन रिटेन केलं होतं. गेल्या हंगामात 14 सामन्यांमध्ये बुमराहने 21 विकेट्स घेतल्या होत्या. 


रोहित शर्मा काय म्हणाला?
आम्हाला प्रत्येक सामना जिंकायचा आहे. पण आमच्या नियोजनानुसार इथे गोलंदाजी झाली नाही. मात्र असं होऊ शकतं. पराभवामुळे निराश नक्कीच आहे पण अजून सगळं संपलेलं नाही. टीमच्या पराभवाला गोलंदाज जबाबदार असल्याचं रोहित शर्मानं म्हटलं आहे. 


मुंबई संघाने पहिली फलंदाजी करत 5 गडी गमावून 177 धावा केल्या. तर दिल्लीसमोर 178 धावांचं लक्ष्य ठेवलं. दिल्ली संघाने 13 ओव्हरनंतर 6 गडी गमावले होते. तर त्यावेळी 104 धावा झाल्या होत्या. मात्र ललित यादव आणि अक्षर पटेलनं पूर्ण सामनाच फिरवला. 


ललित यादव आणि अक्षर पटेल यांनी पार्टनरशीपमध्ये 75 धावा करून दिल्ली संघाला विजय मिळवून दिला. ललित यादवचं अर्धशतक हुकलं तर अक्षरने 38 धावा केल्या. कुलदीप यादवला 3 विकेट्स घेण्यात यश आलं. त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला.